गायीच्या शेणापासून बनवलेल्या इंधनाने उडाले जपानी रॉकेट

टोकियो : आपल्याकडे पंचगव्याचे महत्त्व प्राचीन काळापासूनच सांगितले जाते. गोमूत्र असो किंवा गायीचे शेण, त्यांना आपल्याकडे बरेच महत्त्व आहे. आता जपानने गायीच्या शेणाचा वापर रॉकेटच्या इंधनासाठीही करण्यास सुरुवात केली आहे. जपानच्या स्पेस इंडस्ट्रीने गुरुवारी एका प्रोटोटाईप रॉकेट इंजिनचे परीक्षण केले. या रॉकेटचे इंधन चक्क गायीच्या शेणापासून बनवलेले आहे. गायीच्या शेणापासून बायोमिथेन बनवून त्याच्या सहाय्याने हे रॉकेट … The post गायीच्या शेणापासून बनवलेल्या इंधनाने उडाले जपानी रॉकेट appeared first on पुढारी.
#image_title

गायीच्या शेणापासून बनवलेल्या इंधनाने उडाले जपानी रॉकेट

टोकियो : आपल्याकडे पंचगव्याचे महत्त्व प्राचीन काळापासूनच सांगितले जाते. गोमूत्र असो किंवा गायीचे शेण, त्यांना आपल्याकडे बरेच महत्त्व आहे. आता जपानने गायीच्या शेणाचा वापर रॉकेटच्या इंधनासाठीही करण्यास सुरुवात केली आहे. जपानच्या स्पेस इंडस्ट्रीने गुरुवारी एका प्रोटोटाईप रॉकेट इंजिनचे परीक्षण केले. या रॉकेटचे इंधन चक्क गायीच्या शेणापासून बनवलेले आहे. गायीच्या शेणापासून बायोमिथेन बनवून त्याच्या सहाय्याने हे रॉकेट उडवण्यात आले.
बायोमिथेन इंधनाने उड्डाण केलेल्या या रॉकेटने ताकी शहरामध्ये सुमारे दहा सेकंदांसाठी एका खुल्या हँगर दरवाजातून दहा ते पंधरा मीटरपर्यंत एक निळी-नारंगी ज्वाला फेकली. इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी ताकाहिरो इनागावा यांनी सांगितले की यामध्ये वापरलेला बायोमिथेन पूर्णपणे दोन स्थानिक डेअरी फार्ममधील गायींच्या शेणापासून बनवलेला होता. हे आम्ही केवळ ते पर्यावरणासाठी चांगले आहे म्हणून केले असे नाही तर त्याची निर्मिती स्थानिक पातळीवरही करता येऊ शकते हे दर्शवण्यासाठी केले. ही प्रक्रिया अतिशय किफायतशीरही आहे आणि त्याचे परिणामही चांगले आहेत. गायीच्या शेणापासून बनवलेले हे इंधन शुद्ध आणि प्रभावी आहे. एखाद्या खासगी कंपनीने प्रथमच अशा प्रक्रियेतून इंधन मिळवले आहे. आता हे तंत्र संपूर्ण जगभरात वापरले जाऊ शकते.
गायीच्या शेणापासून रॉकेट उडवणार्‍या इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीज आणि एअर वॉटर फर्मचे म्हणणे आहे की भविष्यात या इंधनाचा वापर करून अंतराळात सॅटेलाईटही स्थापित केले जाऊ शकतात. ही फर्म स्थानिक शेतकर्‍यांच्या साथीने काम करते ज्यांच्याकडे आपल्या शेतात गायीच्या शेणापासून बायोगॅस तयार करण्याची उपकरणे आहेत.
एअर वॉटर फर्म हा बायोगॅस गोळा करते आणि त्याचे रुपांतर रॉकेटच्या इंधनात करते. ‘एअर वॉटर’चे एक इंजिनिअर टोमोहिरो निशिकावा यांनी सांगितले की जपानकडे संसाधनांची कमतरता आहे. अशा वेळी घरगुती स्तरावर उत्पादित, कार्बन-न्यूट्रल ऊर्जेला सुरक्षित केले पाहिजे. त्यासाठी गायीचे शेण उपयुक्त ठरू शकते.
1. गायीच्या शेणापासून बनवलेले बायोमिथेन वापरले रॉकेटमध्ये
2. गायीच्या शेणाचे इंधन शुद्ध व प्रभावी असल्याचा दावा
3. भविष्यात अशा इंधनाचे रॉकेट सॅटेलाईटही स्थापित करील अशी आशा
4. ‘इंटरस्टेलर टेक्नॉलॉजीज’ आणि ‘एअर वॉटर’ फर्मचा उपक्रम
The post गायीच्या शेणापासून बनवलेल्या इंधनाने उडाले जपानी रॉकेट appeared first on पुढारी.

टोकियो : आपल्याकडे पंचगव्याचे महत्त्व प्राचीन काळापासूनच सांगितले जाते. गोमूत्र असो किंवा गायीचे शेण, त्यांना आपल्याकडे बरेच महत्त्व आहे. आता जपानने गायीच्या शेणाचा वापर रॉकेटच्या इंधनासाठीही करण्यास सुरुवात केली आहे. जपानच्या स्पेस इंडस्ट्रीने गुरुवारी एका प्रोटोटाईप रॉकेट इंजिनचे परीक्षण केले. या रॉकेटचे इंधन चक्क गायीच्या शेणापासून बनवलेले आहे. गायीच्या शेणापासून बायोमिथेन बनवून त्याच्या सहाय्याने हे रॉकेट …

The post गायीच्या शेणापासून बनवलेल्या इंधनाने उडाले जपानी रॉकेट appeared first on पुढारी.

Go to Source