Crime news : पत्नीचा खून करणार्या पतीला ठोकल्या बेड्या
शिरूर : पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पसार झालेल्या संशयित आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चार तासांत जेरबंद केले. अशोक भीमराव रंधवे (सध्या रा. कारेगाव, शिरूर) असे त्याचे नाव आहे. सविता अशोक रंधवे (वय 45, रा. कारेगाव, मूळ रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. नगर ) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे जावई सचिन दिलीप कातकाडे यांनी फिर्याद दिली होती. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अशोक याने 7 डिसेंबरला सायंकाळी चारित्र्याच्या संशयावरून त्याची पत्नी सविता हिचा खून केला. त्यानंतर त्याने जावई कातकाडे यांना फोन करून आपण सविता हिचा खून केला आहे. तिचा चेहरा शेवटचा पाहण्यासाठी या, असे सांगितले.
फिर्यादी यांनी याबाबत तत्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे, उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, हवालदार संदीप जगदाळे, कल्पेश राखोंडे, विजय शिंदे, प्रतीक खरबस यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, खून करून अशोक पसार झाला होता. त्याला दारूचे व्यसन असून, तो शिरूर शहरात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शिरूरमध्ये शोध घेतला. सिटी बोरा कॉलेजसमोरील मोकळ्या जागेत त्याला ताब्यात घेत जेरबंद केले.
हेही वाचा :
नांदेड : मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात : जरांगे पाटील
Pune : वालचंदनगरच्या संपावर अद्याप तोडगा नाही
The post Crime news : पत्नीचा खून करणार्या पतीला ठोकल्या बेड्या appeared first on पुढारी.
शिरूर : पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पसार झालेल्या संशयित आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चार तासांत जेरबंद केले. अशोक भीमराव रंधवे (सध्या रा. कारेगाव, शिरूर) असे त्याचे नाव आहे. सविता अशोक रंधवे (वय 45, रा. कारेगाव, मूळ रा. नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. नगर ) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी …
The post Crime news : पत्नीचा खून करणार्या पतीला ठोकल्या बेड्या appeared first on पुढारी.