मनमाड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- कर्नाटक मधील काँग्रेस मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद शहरात देखील उमटून भाजपा कार्यकर्त्यां तर्फे अगोदर वीर सावरकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर खर्गे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
गेल्या आठवड्यात कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत अपशब्द वापरले होते. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. खर्गे यांचा निषेध करण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहरातील एकात्मता चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रथम वीर सावरकर जिंदाबाद, भारत माता की जय, मोदी-शाह जिंदाबाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जिंदाबाद अशा घोषणा देत वीर सावरकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर खर्गे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि मंत्री खर्गे यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत खर्गे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. या आंदोलनात शहराध्यक्ष सचिन संघवी, भाजपचे जिल्हा चिटणीस नारायण पवार, जैन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष सचिन लूणावात, कांतीभाऊ लूणावत, उमा रॉय, एकनाथ बोडके, आशिष भंडारी, राजेंद्र भाबड, बुरहान शेख, सचिन कांबळे, राज परदेशी, बुडण बाबा, अमित सोनवणे, सचिन छाजेड, तोसिफ तांबोळी, बबन फुलवाणी, संजय गांगुर्डे, आकाश खैरे, जितू धिंगाण आदीसह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा :
नाशिक : मयतांच्या अंत्यविधी, दफनविधी’चा खर्च ग्रामपंचायत करणार, चाटोरी गावाचा ठराव
Pimpri News : प्राधिकरण बनले समस्यांचे माहेरघर !
MP News : मध्य प्रदेशात भाजपला मतदान केल्याने वहिनीला मारहाण; दीराविरूद्ध गुन्हा दाखल
The post मनमाडला खर्गेंच्या प्रतिमेेेला जोडेमारो’ appeared first on पुढारी.
मनमाड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- कर्नाटक मधील काँग्रेस मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद शहरात देखील उमटून भाजपा कार्यकर्त्यां तर्फे अगोदर वीर सावरकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर खर्गे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. गेल्या आठवड्यात कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे …
The post मनमाडला खर्गेंच्या प्रतिमेेेला जोडेमारो’ appeared first on पुढारी.