मुंबई : मुख्यमंत्र्यांनी चालवले समुद्रकिनारा स्वच्छ करणारे यंत्र
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दि. ३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाला. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली.
संपूर्ण स्वच्छता मोहिमेची पाहणी करण्यासाठी जुहू परिसरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्कॉन मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. पूजेनंतर मंदिर विश्वस्तांकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदीर समितीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्रंथतुला करण्यात आली.
पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, माजीमंत्री डॉ. दीपक सावंत, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.
#WATCH | At the cleanliness drive event on Juhu Beach, Maharashtra CM Eknath Shinde drives a tractor. pic.twitter.com/leDU2jJLGf
— ANI (@ANI) December 9, 2023
हेही वाचा :
Rajasthan New CM : राजस्थान मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाबा बालकनाथ बाहेर!, कारणही केले स्पष्ट
Pro-Term Speaker of Telangana : नवनिर्वाचित आमदारांनी अकबरुद्दीन ओवेसींसमोर घेतली शपथ; भाजप आमदारांचा बहिष्कार
गाझातील शस्त्रसंधीचा ठराव अमेरिकेने रोखला; UNच्या सुरक्षा परिषदेत वापरला नकाराधिकार | US Vetoes Gaza Ceasefire Resolution
The post मुंबई : मुख्यमंत्र्यांनी चालवले समुद्रकिनारा स्वच्छ करणारे यंत्र appeared first on पुढारी.
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दि. ३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाला. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात …
The post मुंबई : मुख्यमंत्र्यांनी चालवले समुद्रकिनारा स्वच्छ करणारे यंत्र appeared first on पुढारी.