मध्‍य प्रदेशचा नवा मुख्‍यमंत्री सोमवारी ठरणार, भाजप विधिमंडळ पक्ष बैठकीत निर्णयाची शक्‍यता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र गेली सहा दिवस राज्‍यातील मुख्‍यमंत्री पदासाठीचा चर्चा सुरु आहे.(MP New CM) दरम्‍यान, सोमवार, ११ डिसेंबर रोजी मध्‍य प्रदेशमध्‍ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व आमदार या बैठकीला उपस्‍थित राहणार आहेत. या बैठकीत मुख्‍यमंत्रीपदाच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब होईल, असे मानले जात आहे. … The post मध्‍य प्रदेशचा नवा मुख्‍यमंत्री सोमवारी ठरणार, भाजप विधिमंडळ पक्ष बैठकीत निर्णयाची शक्‍यता appeared first on पुढारी.
#image_title

मध्‍य प्रदेशचा नवा मुख्‍यमंत्री सोमवारी ठरणार, भाजप विधिमंडळ पक्ष बैठकीत निर्णयाची शक्‍यता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र गेली सहा दिवस राज्‍यातील मुख्‍यमंत्री पदासाठीचा चर्चा सुरु आहे.(MP New CM) दरम्‍यान, सोमवार, ११ डिसेंबर रोजी मध्‍य प्रदेशमध्‍ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व आमदार या बैठकीला उपस्‍थित राहणार आहेत. या बैठकीत मुख्‍यमंत्रीपदाच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब होईल, असे मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर कोणताही गोंधळ नाही. याबाबत निर्णय घेताना पक्षाची एक प्रक्रिया असते.त्‍यामुळे तुम्‍हाला प्रक्रिया पार पडण्‍याची वाट पहावी लागेल. अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी विचार मंथन सुरू आहे, आता लवकर मुख्यमंत्रीपदाच्‍या कोणाकडे सोपवावे याकडे शिक्‍कामोर्तब होणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख आणि वेळ निश्चित झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये सोमवारी म्हणजेच ११ डिसेंबर रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. याबाबत सर्व आमदारांना अधिकृतरित्या कळविण्यात आले आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय नेतृत्वाने निवडलेले निरीक्षक असतील. या बैठकीत मुख्‍यमंत्रीपदाच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब होईल, असे मानले जात आहे.
मध्‍य प्रदेशमधील मुख्‍यमंत्रीपदाचे नाव निश्‍चित करण्‍यासाठी ८ डिसेंबर रोजी भाजपने पक्ष निरीक्षकांची नावांची घोषणा केली होती. मध्य प्रदेशसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष के लक्ष्मण आणि पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आशा लाक्रा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवराज सिंह चौहानांसह ‘ही’ नावे चर्चेत
मध्‍य प्रदेश मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्थती शिवराजसिंह चौहान यांच्‍यासह प्रल्‍हाद पटेल, विष्णु दत्त शर्मा, ज्‍योतिरादित्‍य शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे.
हेही वाचा : 

Rajasthan New CM : राजस्‍थान मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीतून बाबा बालकनाथ बाहेर!, कारणही केले स्‍पष्‍ट
गाझातील शस्त्रसंधीचा ठराव अमेरिकेने रोखला; UNच्या सुरक्षा परिषदेत वापरला नकाराधिकार | US Vetoes Gaza Ceasefire Resolution

 
 
The post मध्‍य प्रदेशचा नवा मुख्‍यमंत्री सोमवारी ठरणार, भाजप विधिमंडळ पक्ष बैठकीत निर्णयाची शक्‍यता appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र गेली सहा दिवस राज्‍यातील मुख्‍यमंत्री पदासाठीचा चर्चा सुरु आहे.(MP New CM) दरम्‍यान, सोमवार, ११ डिसेंबर रोजी मध्‍य प्रदेशमध्‍ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व आमदार या बैठकीला उपस्‍थित राहणार आहेत. या बैठकीत मुख्‍यमंत्रीपदाच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब होईल, असे मानले जात आहे. …

The post मध्‍य प्रदेशचा नवा मुख्‍यमंत्री सोमवारी ठरणार, भाजप विधिमंडळ पक्ष बैठकीत निर्णयाची शक्‍यता appeared first on पुढारी.

Go to Source