पिंपरी : ‘नवी दिशा’ला ग्वांगझू पुरस्कार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शहरातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘नवी दिशा’ उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेला ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चीनमधील ग्वांगझू शहरात हा सन्मान सोहळा झाला. या स्पर्धेत भारत देशातील पिंपरी-चिंचवड या एकमेव शहराचा समावेश झाला होता. महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्य विभागाचे सहाय्यक … The post पिंपरी : ‘नवी दिशा’ला ग्वांगझू पुरस्कार appeared first on पुढारी.
#image_title

पिंपरी : ‘नवी दिशा’ला ग्वांगझू पुरस्कार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शहरातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘नवी दिशा’ उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेला ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चीनमधील ग्वांगझू शहरात हा सन्मान सोहळा झाला. या स्पर्धेत भारत देशातील पिंपरी-चिंचवड या एकमेव शहराचा समावेश झाला होता. महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, समुह संघटिका वैशाली खरात, सीटीओच्या प्रज्ञा ठाकूर यांनी आयुक्तांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
महापालिकेच्या वतीने नवी दिशा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून शहरातील सामुदायिक शौचालयांचे देखभाल करण्याचे काम आर्थिक मोबदला देऊन स्थानिक महिला बचत गट आणि महिला मंडळांना देण्यात येत आहे. यामुळे महिलांना आर्थिक उत्पन्नाची संधी उपलब्ध झाली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये 54 देशांतील 193 शहरांचा समावेश होता. त्यात भारताचे पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर निवडण्यात आले होते. या स्पर्धेच्या नियमांचे मूल्यमापनासाठी 11 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत गुआंगझो येथील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या समितीने शहराला भेट दिली होती. ऑनलाइन प्रतिसादामध्ये पिंपरी-चिंचवडच्या नवी दिशा उपक्रमाच्या बाजूने 13 लाख जणांनी मते नोंदविली होती.
पिंपरी-चिंचवडची निवडशहराला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे महापालिकेने परिवर्तनशील शहरी विकासाकडे टाकलेले एक पाऊल आहे. महिला बचत गटांच्या प्रयत्नातून चालवलेला नवी दिशा उपक्रम सर्वसमावेशक वचनबद्धतेचे व शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण आहे. पिंपरी चिंचवडला मिळालेल्या या जागतिक मान्यतेमध्ये नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच, सर्व बचत गटांचा मोलाचा वाटा आहे. नवी दिशा उपक्रमामध्ये अधिकाधिक महिलांना सहभागी करून घेण्याचा व येत्या काही महिन्यांत लाभार्थ्यांची संख्या तीनपटीने वाढवण्याचे नियोजन आहे.
– शेखर सिंह, आयुक्त

हेही वाचा

पाणी, ज्यूस हाच तिचा 50 वर्षांपासूनचा आहार
800 वर्षांपूर्वीचा डौलदार वृक्ष!
सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद; शेतकरी आक्रमक

The post पिंपरी : ‘नवी दिशा’ला ग्वांगझू पुरस्कार appeared first on पुढारी.

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शहरातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘नवी दिशा’ उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेला ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चीनमधील ग्वांगझू शहरात हा सन्मान सोहळा झाला. या स्पर्धेत भारत देशातील पिंपरी-चिंचवड या एकमेव शहराचा समावेश झाला होता. महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्य विभागाचे सहाय्यक …

The post पिंपरी : ‘नवी दिशा’ला ग्वांगझू पुरस्कार appeared first on पुढारी.

Go to Source