धक्कादायक! प. बंगालमधील हॉस्पिटलमध्ये १० नवजात बालकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये २४ तासांत ९ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २ वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात दाखल असलेल्या इतर नवजात व मुलांचे पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान रूग्णालय परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, या घटनेने राज्यात देखील खळबळ … The post धक्कादायक! प. बंगालमधील हॉस्पिटलमध्ये १० नवजात बालकांचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

धक्कादायक! प. बंगालमधील हॉस्पिटलमध्ये १० नवजात बालकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये २४ तासांत ९ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २ वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात दाखल असलेल्या इतर नवजात व मुलांचे पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान रूग्णालय परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, या घटनेने राज्यात देखील खळबळ उडाली आहे. या संदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ही दिली आहे. (West Bengal)
मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्रोफेसर अमित दान म्हणाले, जंगीपूर उपविभागीय रुग्णालयात पीडब्ल्यूडीचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथील लहान मुलांना रुग्णांना मुर्शिदाबाद येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यामुळे येथील अर्भक रुग्णांची संख्या वाढली. या मुलांना जेव्हा याठिकाणी आणले तेव्हाच त्यांचे वजन आधीच कमी झाले होते. तसेच त्यांना या रुग्णालयात आणण्यासाठी आधीच ५ ते६ तास लागले होते. त्यामुळे त्यांना वाचवणे कठीण झाले होते. दरम्यान या घटनेत गेल्या २४ तासांत या १० लहान मुलांचा दुर्दैवी अंत झाला. (West Bengal)

West Bengal | Deaths of 10 children reported at Medical College and Hospital in Murshidabad.
Prof. Amit Dan of the Medical College and Hospital says, “PWD’s work is going on at the Jangipur Subdivision Hospital. So, patients from there were shifted here. Hence, the number of… pic.twitter.com/5cwWpgqMET
— ANI (@ANI) December 8, 2023

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात एकाच दिवसात इतक्या नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी एक समिती आधीच स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान मृत्यू झालेल्या दहापैकी तीन मुलांचा जन्म हा मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे.
रुग्णालय नूतनीकरणामुळे नवजात बालकांचे शिफ्टींग
वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा आठवड्यांपासून प. बंगालमधील जंगीपूर उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे सर्व बालकांना बहारमपूरला पाठवले जात आहे. तर काही वेळा डोमकल, लालबाग उपविभागीय रुग्णालयातील नवजात बालकांना बहारमपूरला मोठ्या प्रमाणात रेफर केले जात असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  दरम्यान या रुग्णालयांमध्ये बालकांची तब्येत अधिक बिघडल्यास, नवजात बालकांना मुर्शिदाबाद वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवले जाते, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:

यंदा ‘डेस्टिनेशन वेडिंग’ची धूम; तरुण जोडप्यांकडून आवडत्या ठिकाणांना प्राधान्य
Mahua Moitra | महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात, लोकसभेतून हकालपट्टीची समितीची शिफारस
Thackeray vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार आहे का? : अरविंद सावंत

The post धक्कादायक! प. बंगालमधील हॉस्पिटलमध्ये १० नवजात बालकांचा मृत्यू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये २४ तासांत ९ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २ वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात दाखल असलेल्या इतर नवजात व मुलांचे पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान रूग्णालय परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, या घटनेने राज्यात देखील खळबळ …

The post धक्कादायक! प. बंगालमधील हॉस्पिटलमध्ये १० नवजात बालकांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source