Crime news : ब्राम्हणीत जागेवरून पाच जणांना मारहाण
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : ‘तुम्ही राहता, ती जागा आमची आहे, तुम्ही येथे राहायचे नाही’, असे म्हणत आरोपींनी धक्काबूक्की करत दगडाने मारहाण केल्याची घटना दिनांक 2 डिसेंबर रोजी राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे घडली. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मयुरी आप्पासाहेब हापसे (वय 24 वर्षे, रा. ब्राम्हणी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 .वा चे सुमारास मयुरी हापसे त्यांची भाची समिक्षा शेटे या दोघी घरी असताना तेथे आरोपी आले व मला म्हणाले की, ‘तुम्ही राहता ती जागा आमची आहे, तुम्ही येथे राहायचे नाही’. असे म्हणून मला त्यांनी शिवीगाळ केली.
त्यावेळी मयुरी हापसे त्यांना म्हणाल्या की, ‘आता घरी कोणी नाही. तुम्ही नंतर येवुन बोला’. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी धक्काबुक्की केली. त्यावेळी मयुरी हापसे यांनी त्यांचे पती व सासरे यांना फोन करुन घरी बोलावून घेतले. त्यावेळी आरोपींनी सर्वांना दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच तुमचा बेतच पाहू, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर मयुरी आप्पासाहेब हापसे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब बाळासाहेब हापसे, रमेश बाळासाहेब हापसे, वैभव भाऊसाहेब हापसे, पोपट रमेश हापसे, सुनिल सोपान हापसे (सर्व रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) यांचे विरुद्ध मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.
हेही वाचा :
नागपूर : धान उत्पादकांशी शेतात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट
Pune News : अतिरिक्त आयुक्त अॅक्शन मोडवर; नागपूर चाळीची केली पाहणी
The post Crime news : ब्राम्हणीत जागेवरून पाच जणांना मारहाण appeared first on पुढारी.
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : ‘तुम्ही राहता, ती जागा आमची आहे, तुम्ही येथे राहायचे नाही’, असे म्हणत आरोपींनी धक्काबूक्की करत दगडाने मारहाण केल्याची घटना दिनांक 2 डिसेंबर रोजी राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे घडली. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मयुरी आप्पासाहेब हापसे (वय 24 वर्षे, रा. ब्राम्हणी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले …
The post Crime news : ब्राम्हणीत जागेवरून पाच जणांना मारहाण appeared first on पुढारी.