शिर्डी लोकसभेसाठी ठाकरे सेनेने ठोकला शड्डू
राहुरी: पुढारी वृत्तसेवा : उबाठा सेनेची साथ सोडत शिवसेना (शिंदे गट) दाखल झालेले खा. सदाशिव लोखंडे यांच्या पराभवासाठी उबाठा सेनेने रणनिती आखली आहे. त्यादृष्टीने पावले टाकण्याकरीता ठाकरे सेनेने दंड थोपटले असून रावसाहेब खेवरे यांच्यावर संपर्क प्रमुखांची जबाबदारी सोपविली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करत त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख म्हणून रावसाहेब खेवरे यांची नियुक्ती करतानाच लोकसभा प्रचारप्रमुख म्हणून सुहास वहाडणे यांच्यावर कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
राजेंद्र पठारे यांच्यावर श्रीगोंदा, नेवासा, राहुरीची जबाबदारी देण्यात आली आहे. सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्याकडे कोपरगाव, श्रीरामपू, नेवासा आणि दिलीप साळगट यांच्याकडे संगमनेर, अकोले, राहाता तालुका देण्यात आला आहे. जिल्हा समन्वयकपदी नितीन औताडे यांची नियुक्ती करत त्यांना कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा तर मुजीब शेख यांच्याकडे संगमनेर, अकोले, राहाता तालुका सोपविण्यात आला आहे. जिल्हा संघटक पदावर नाना बावके यांची नियुक्ती करत त्यांना संगमनेर, अकोले, राहाता तर प्रमोद लबडे यांच्याकडे कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा तालुक्याची धुरा देण्यात आली आहे.
तालुकानिहाय पदाधिकारी असे
राहाता : उपजिल्हा प्रमुख-अनिल बांगरे , तालुका प्रमुख संजय शिंदे (उत्तर), सोमनाथ गोरे (दक्षिण), शहर प्रमुख- गणेश सोमवंशी; विधानसभा संपटक भानुदास कातोरे; विधानसभा समन्वयक अमोल खापटे, शिर्डी शहर संघटक-अमोल गायके, शिर्डी शहर समन्वयक-सुनील परदेशी, शिर्डी शहरप्रमुख- सचिन कोते, राहाता शहर संघटक गोरक्षनाथ वाकचौरे, राहाता शहर समन्वयक भागवत लांडगे.
राहुरी : उपजिल्हाप्रमुख- भागवत मुंगसे, तालुकाप्रमुख-सचिन म्हसे, शहरप्रमुख डॉ. संजय म्हसे, विधानसभा संघटक-बाळासाहेब गाडे, विधानसभा समन्वयक प्रशांत शिंदे, शहर संघटक विजय शिरसाठ, श्रीरामपूर विधानसभा संघटक (32 गावे) राहूल चोथे, देवळाली शहरप्रमुख- बाबासाहेब मुसमाडे, देवळाली शहर समन्वयक तुषार शेटे, देवळाली शहर संघटक अनिल चव्हाण.
नेवासा : उपजिल्हाप्रमुख- हरिभाऊ शेळके, तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हसके, शहरप्रमुख- नितीन जगताप, विधानसभा संघटक पंकज लामहाते, विधानसभा समन्वयक- गोकुळ लोंढे, शहर संघटक मनीष चक्रनारायण, शहर समन्वयक नारायण लष्करे.
श्रीरामपूर : उपजिल्हाप्रमुक सचिन बडधे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर (दक्षिण), लखन भगत (उत्तर), श्रीरामपूर शहरप्रमुख रमेश घुले, विधानसभा संघटक- संजय छल्लारे, शहर संघटक अतुल शेटे, शहर समन्वयक सुधीर वायखिंडे, विधानसभा समन्वयक -एकनाथ गुलदगड.
संगमनेर : उपजिल्हाप्रमुख-अशोक सातपुते, तालुकाप्रमुख – संजय फड (पठार), शहरप्रमुख अप्पाशेठ केसेकर, शहर विधानसभा संघटक – गुलाबराजे भोसले (पठार), विधानसभा संघटक कैलास वाकचौरे, शहर संघटक- रवींद्र ऊर्फ पप्पू कानकाटे, शहर समन्वयक-प्रसाद पवार
कोपरगाव : उपजिल्हाप्रमुख- श्रीरंग चांदगुडे, तालुकाप्रमुख-बाळासाहेब राहाणे, शहरप्रमुख सनी वाघ; विधानसभा संघटक अस्लम शेख, विधानसभा समन्वयक शिवाजी ठाकरे, शहर संघटक-कलविंदर दांडियाल, शहर समन्वयक कालूअप्पा आव्हाड, उपजिल्हाप्रमुख (शहर) कैलास जाधव.
अकोले : उपजिल्हाप्रमुख महेश नवले (आदिवासी विभाग), रामा तिकांडे; तालुकाप्रमुख- मच्छिंद्र धुमाळ, संतोष मूर्तडक (आदिवासी विभाग), शहरप्रमुख शिवाजी शेटे, विधानसभा समन्वयक मनोज मोरे, विधानसभा संघटक मधुकर तळपाडे, शहर संघटक नितीन नाईकवाडी, शहर समन्वयक – प्रमोद मंडलिक
The post शिर्डी लोकसभेसाठी ठाकरे सेनेने ठोकला शड्डू appeared first on पुढारी.
राहुरी: पुढारी वृत्तसेवा : उबाठा सेनेची साथ सोडत शिवसेना (शिंदे गट) दाखल झालेले खा. सदाशिव लोखंडे यांच्या पराभवासाठी उबाठा सेनेने रणनिती आखली आहे. त्यादृष्टीने पावले टाकण्याकरीता ठाकरे सेनेने दंड थोपटले असून रावसाहेब खेवरे यांच्यावर संपर्क प्रमुखांची जबाबदारी सोपविली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करत त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख म्हणून रावसाहेब …
The post शिर्डी लोकसभेसाठी ठाकरे सेनेने ठोकला शड्डू appeared first on पुढारी.