नांदेडच्या दक्षिण मतदारसंघात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार

नवीन नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा झंझावाती दौरा सुरू झाला असून नांदेड जिल्ह्यात त्यांची तोफ धडाडणार आहे. त्यांची याठिकाणी त्यांचीॉ दुसरी सभा होणार आहे. शुक्रवारी (दि.8) सकाळी 10 वाजता जिजाऊनगर वाडीपाटी येथील 111 एकरच्या भव्य मैदानावर होणार आहे.इ या सभेची जय्यत तयारी सकल मराठा समाजाच्या वतीने तन मन धनाने करण्यात … The post नांदेडच्या दक्षिण मतदारसंघात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार appeared first on पुढारी.
#image_title

नांदेडच्या दक्षिण मतदारसंघात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार

नवीन नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा झंझावाती दौरा सुरू झाला असून नांदेड जिल्ह्यात त्यांची तोफ धडाडणार आहे. त्यांची याठिकाणी त्यांचीॉ दुसरी सभा होणार आहे. शुक्रवारी (दि.8) सकाळी 10 वाजता जिजाऊनगर वाडीपाटी येथील 111 एकरच्या भव्य मैदानावर होणार आहे.इ या सभेची जय्यत तयारी सकल मराठा समाजाच्या वतीने तन मन धनाने करण्यात आली आहे. ही सभा ऐतिहािसक होईल पाच लाखांहून अधि क समाजबांधव या सभेस उपस्थित राहतील असा अंदाज व्यवस्थापन समितीने व्यक्त केला आहे.
मागील आठवडाभरापासून या सभेची जय्यत तयारी सुरू असून चाळीस गावातील हजारो समाजबांधव या सभेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. गुरूवारी रात्री जरांगे पाटील हे नांदेड शहरात दाखल होणार असून शुक्रवारी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ही मुलुख मैदानी तोफ धडाडणार आहे. सभास्थळी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून भारतीय आसनव्यवस्था राहणार आहे. व्यासपीठावर छत्रपती शिवरायांचा बारा फुटाचा अश्र्वारूढ पुतळा विराजमान राहणार आहे.
व्यासपीठावर अन्य कोणतेही नेते राहणार नसून जरांगे पाटील हे एकटेच राहणार आहेत. व्यासपीठावरआगमन होताच त्यांचे आगळ्यावेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यात येणार आहे. या सभेत ते काय भाष्य करणार याकडे सकल समाजाचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी पोलीसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला असून 40 अधिकारी तसेच 350 हूून अधिक कर्मचारी बंदोबस्तामध्ये सहभागी होणार आहेत.त्याचबरोबर अडीच हजार समाजबांधव स्वयंसेवक पोलीस यंत्रणेला बंदोबस्तासाठी मदत करणार आहेत, यामध्ये तीनशे महिला स्वयंसेविकांचा समावेश आहे.तसेच अडीचशे माजी सैनिकही या ठिकाणी सेवा बजावणार आहेत.
सव्वाशे क्विंटलची पुरीभाजी अन् पन्नास क्विंटलची खिचडी..
सभेसाठी येणार्या समाजबांधवासाठी तब्बल सव्वाशे क्विंटलची पुरी भाजी करण्यात आली असून पन्नास क्विंटल तांदळाची खिचडी करण्यात येणार आहे.अडीच लाख पाणी बॉटल सभास्थळी देण्यात येणार आहेत. सभास्थळाकडे जाणार्या मार्गावर ठिकठिकाणी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
The post नांदेडच्या दक्षिण मतदारसंघात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार appeared first on पुढारी.

नवीन नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा झंझावाती दौरा सुरू झाला असून नांदेड जिल्ह्यात त्यांची तोफ धडाडणार आहे. त्यांची याठिकाणी त्यांचीॉ दुसरी सभा होणार आहे. शुक्रवारी (दि.8) सकाळी 10 वाजता जिजाऊनगर वाडीपाटी येथील 111 एकरच्या भव्य मैदानावर होणार आहे.इ या सभेची जय्यत तयारी सकल मराठा समाजाच्या वतीने तन मन धनाने करण्यात …

The post नांदेडच्या दक्षिण मतदारसंघात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार appeared first on पुढारी.

Go to Source