बांगला देशचा 172 धावांत खुर्दा

मिरपूर; वृत्तसंस्था : मिचेल सँटेनर व ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 3 बळी घेतल्यानंतर यजमान बांगला देशला न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 172 धावांवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचीही पहिल्या दिवसअखेर खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी 5 बाद 55 अशी दाणादाण उडाली होती. ‘आयसीसी’ विश्व चॅम्पियनशिपमधील भाग असलेल्या या कसोटी मालिकेत बांगला देश 1-0 फरकाने … The post बांगला देशचा 172 धावांत खुर्दा appeared first on पुढारी.
#image_title

बांगला देशचा 172 धावांत खुर्दा

मिरपूर; वृत्तसंस्था : मिचेल सँटेनर व ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 3 बळी घेतल्यानंतर यजमान बांगला देशला न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 172 धावांवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचीही पहिल्या दिवसअखेर खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी 5 बाद 55 अशी दाणादाण उडाली होती. ‘आयसीसी’ विश्व चॅम्पियनशिपमधील भाग असलेल्या या कसोटी मालिकेत बांगला देश 1-0 फरकाने आघाडीवर आहे. यापूर्वी सिल्हेत येथे खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत या संघाने 150 धावांनी दणकेबाज विजय मिळवला होता.
बांगला देशने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांच्यावरच बुमरँगप्रमाणे उलटल्याचे अधोरेखित झाले. मेहमुदुल हसन जॉय (14) व झाकीर हसन (8) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले, तर कर्णधार नजमूल (9), मोमिनूल हक (5) हे देखील स्वस्तात बाद झाले. मधल्या फळीतील मुशफिकूर रहिमने 35, तर शहादत होसेनने 31 धावांचे योगदान दिले. याशिवाय, अन्य एकाही फलंदाजाला अजिबात प्रतिकार करता आला नाही. महेदी हसन मिराजने 20 धावांसह उत्तम सुरुवात केली; पण तो ही याचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही.
नईम हसन 13 धावांवर नाबाद राहिला, तर अन्य फलंदाजांनी ठराविक अंतराने बाद होण्याचा कित्ता गिरवला. किवीज संघातर्फे सँटेनर व ग्लेन फिलिप्स सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. या दोघांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. सँटेनरने 65 धावांत 3, तर फिलिप्सने 31 धावांत 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय अजाज पटेलने 54 धावांत 2, तर टीम साऊदीने 5 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरात किवीज संघाचीही दाणादाण उडाली. बुधवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी त्यांची अवघ्या 12.4 षटकांत 5 बाद 55 अशी अवस्था झाली होती. टॉम लॅथम (4), कॉनवे (11), विल्यमसन (13), हेन्री निकोल्स (1), टॉम ब्लंडेल (0) आल्या पावली परतत राहिले आणि यामुळे पाहता पाहता त्यांचा निम्मा संघ तंबूत पोहोचला. यजमान बांगला देश संघातर्फे महेदी हसन मिराजने 17 धावांत 3, तर तैजूल इस्लामने 29 धावांत 2 बळी घेतले.

The hosts all-out for 172 🏏
Glenn Phillips (3-31), Mitchell Santner (3-65), Ajaz Patel (2-54) and Tim Southee (1-0) in the wickets. Follow play LIVE and free in NZ on the ThreeNow app or at https://t.co/wkAllxX9Gf 📺 LIVE scoring https://t.co/nRgzu3oxpZ 📲 pic.twitter.com/ezTWtpeZGB
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 6, 2023

हेही वाचा :

Ratan Tata Deepfake Video | रतन टाटांच्या शिफारशीनुसार गुंतवणूक करत असाल तर सावधान! स्वत: पोस्ट करत म्हटले हे तर ‘fake’
Nashik News : समृद्धीवरील अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत
तडका : बेपत्ता की परागंदा!

The post बांगला देशचा 172 धावांत खुर्दा appeared first on पुढारी.

मिरपूर; वृत्तसंस्था : मिचेल सँटेनर व ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 3 बळी घेतल्यानंतर यजमान बांगला देशला न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 172 धावांवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचीही पहिल्या दिवसअखेर खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी 5 बाद 55 अशी दाणादाण उडाली होती. ‘आयसीसी’ विश्व चॅम्पियनशिपमधील भाग असलेल्या या कसोटी मालिकेत बांगला देश 1-0 फरकाने …

The post बांगला देशचा 172 धावांत खुर्दा appeared first on पुढारी.

Go to Source