सोलापूर : निलंबित शिक्षणाधिकारी लोहारांकडे ५.८५ कोटींचे घबाड
सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार याने लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना सेवा कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक पाच कोटी 85 लाख रुपयांपेक्षा अधिक अवैध संपत्ती मिळविल्याप्रकरणी त्यांच्यासह त्याची पत्नी व मुलाविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
डिसले गुरुजींवर केली होती कारवाई
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर लोहार यांनी कारवाई केली होती. सोलापूरचा हा शिक्षक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणारा पहिला शिक्षक होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून आपली छाप टाकण्याचा प्रयत्न लोहार करत होते. पण, डिसले प्रकरण राज्य पातळीवर गाजले होते. त्याच लोहारावर गुन्हा दाखल झाला आहे.
The post सोलापूर : निलंबित शिक्षणाधिकारी लोहारांकडे ५.८५ कोटींचे घबाड appeared first on पुढारी.
सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार याने लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना सेवा कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक पाच कोटी 85 लाख रुपयांपेक्षा अधिक अवैध संपत्ती मिळविल्याप्रकरणी त्यांच्यासह त्याची पत्नी व मुलाविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. …
The post सोलापूर : निलंबित शिक्षणाधिकारी लोहारांकडे ५.८५ कोटींचे घबाड appeared first on पुढारी.