दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी, छातीत ठोसा लागल्याने मृत्यू
दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा; दोघांचा वाद साेडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना शहरातील सिद्धार्थनगरमध्ये मंगळवारी (दि.५) रात्री घडली. या प्रकरणी दिंडाेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका संशयिताला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिध्दार्थनगर येथे बाळू माघाडे यांच्या घरासमोर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास मयूर अनिल अहिरे व बाळू माघाडे यांचे भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी योहान बन्सी वारडे (३८) हा गेला असता, रागाच्या भरात मयूर अहिरे यांनी योहानच्या छातीच्या डाव्या बाजूस लाेखंडी फायटरसारख्या हत्याराने जोरदार ठोसा मारला. तो हृदयविकाराचा रुग्ण असल्याने काही तासांतच हृदयाचा त्रास बळावून त्याचा पहाटे मृत्यू झाला. पोलिसांनी मयूर अहिरेला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. दरम्यान पहाटे वारडेचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरताच परिसरात तणाव निर्माण झाला. दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह पोलिस ठाण्यासमोर आणत संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिस उपअधीक्षक संजय बांबळे व पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी नातेवाइकांची समजूत काढत योग्य त्या कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. नंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा :
कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याचा ३,१०० रुपये दर जाहीर
तीन शिक्षणाधिकार्यांना एकाचवेळी दणका; सापडले 10 कोटींचे घबाड
Eknath Shinde : कायदाच नव्हे; तर मराठा आरक्षण देणार : मुख्यमंत्री शिंदे
The post दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी, छातीत ठोसा लागल्याने मृत्यू appeared first on पुढारी.
दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा; दोघांचा वाद साेडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना शहरातील सिद्धार्थनगरमध्ये मंगळवारी (दि.५) रात्री घडली. या प्रकरणी दिंडाेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका संशयिताला अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिध्दार्थनगर येथे बाळू माघाडे यांच्या घरासमोर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास मयूर अनिल अहिरे व बाळू माघाडे यांचे भांडण …
The post दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी, छातीत ठोसा लागल्याने मृत्यू appeared first on पुढारी.