पुढारी ऑनलाइन डेस्क : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यांच्या खासगी आणि राजकीय आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात वडील आणि मुलीचं नातं कसे होते? याबाबतही लिहिले आहे.
इंडिया टुडेला शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ‘In Pranab, My Father: A Daughter Remembers’ यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रणव मुखर्जी आणि राहुल गांधी यांच्यातील एक भेटीचा किस्सा सांगितला आहे. ज्यानंतर त्यांनी राहुल गांधी पंतप्रधान होण्यात किती अडचणी आहेत यावर उपहासात्मकपणे भाष्य केलं होतं.
बाबा सकाळी मुघल गार्डनमध्ये चालत असताना राहुल गांधी त्यांना भेटायला आले होते. त्यांना चालताना आणि पूजा करताना व्यत्यय आणलेलं आवडत नसे. पण तरीही त्यांनी भेट घेतली. नंतर मला समजलं की, राहुल गांधी त्यांना संध्याकाळी भेटणं अपेक्षित होतं,” असं त्यांनी सांगितलं. जेव्हा मी बाबांना याबद्दल सांगितलं, तेव्हा ते संतापले नाहीत. जे उपाहासात्मकपणे म्हणाले की, जर राहुल गांधीच्या कार्यालयाला AM आणि PM यातील फरक कळत नसेल तर ते पंतप्रधान कसे होतील?,” असं शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या.
हेही वाचा :
‘धारावीच्या नागरिकांनी मातोश्रीवर मोर्चा नेला तर मी…’ मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Amit Shah : ‘नेहरुंच्या चुकांमुळेच पाकव्याप्त काश्मीरची समस्या’
NCRB चा अहवाल कसा वाचायचा हे शिकून घ्या; फडणवीसांचा वडेट्टीवरांना टोला
The post ‘..तर ते पंतप्रधान कसे होतील?’ राहुल गांधींबद्दल काय म्हणाले होते प्रणव मुखर्जी? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाइन डेस्क : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यांच्या खासगी आणि राजकीय आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात वडील आणि मुलीचं नातं कसे होते? याबाबतही लिहिले आहे. इंडिया टुडेला शर्मिष्ठा मुखर्जी यांनी …
The post ‘..तर ते पंतप्रधान कसे होतील?’ राहुल गांधींबद्दल काय म्हणाले होते प्रणव मुखर्जी? appeared first on पुढारी.