बीड : गेवराई येथे विद्युत तारेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू
गेवराई; पुढारी वृत्तसेवा : भंगारची गाडी भरताना विद्युत खांबावरील तारेला अचानक हात लागल्याने एका कामागाराचा जागीच मृत्यू झाला. गेवराई येथील मोंढा नाका परिसरात आज (दि.६) सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. मोमिन नय्युम (वय ४५) असे या कामगाराचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गेवराई शहरातील मोंढा परिसरात मोमिन नय्युम व शेख रीजवान हे दोघे मजुर एका भंगार दुकानावर काम करीत होते. यावेळी भंगाराची गाडी भरताना दोघांनाही विद्युत तारेचा जोराचा झटका बसला. यामध्ये मोमीन नय्युम यांचा जागीच मृत्यू झाला तर शेख रीजवान हे गंभीर जखमी झाले. शेख यांना पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे.
हेही वाचा :
ठाणे: डोंबिवली एमआयडीसीत केमिकल ड्रमचा स्फोट; ४ कामगार गंभीर जखमी
जळगाव : श्री शिवपुराण कथेत महिला चोरट्यांचा सुळसुळाट; महिला टोळीला अटक
जळगाव : जरांगे पाटलांच्या सभेत लुटमार करणाऱ्यांना अटक; भुसावळ तालुक्यातील पोलिसांची कारवाई
The post बीड : गेवराई येथे विद्युत तारेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू appeared first on पुढारी.
गेवराई; पुढारी वृत्तसेवा : भंगारची गाडी भरताना विद्युत खांबावरील तारेला अचानक हात लागल्याने एका कामागाराचा जागीच मृत्यू झाला. गेवराई येथील मोंढा नाका परिसरात आज (दि.६) सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. मोमिन नय्युम (वय ४५) असे या कामगाराचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गेवराई शहरातील मोंढा परिसरात मोमिन नय्युम व शेख रीजवान …
The post बीड : गेवराई येथे विद्युत तारेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू appeared first on पुढारी.