कोल्हापूर: उदय साखर कारखान्याचा ३२०० रुपये ऊसदर जाहीर

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदय साखर कारखान्याने (अथणी शुगर युनिट २) मागील हंगामातील गळीत उसाचे प्रतिटन १०० रुपये तसेच चालू गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक १०० रुपये प्रमाणे ऊसदर त्वरित जाहीर करावा, अन्यथा शनिवार (दि.९) पासून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर बेमुदत वजनकाटा बंद आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने … The post कोल्हापूर: उदय साखर कारखान्याचा ३२०० रुपये ऊसदर जाहीर appeared first on पुढारी.
#image_title

कोल्हापूर: उदय साखर कारखान्याचा ३२०० रुपये ऊसदर जाहीर

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदय साखर कारखान्याने (अथणी शुगर युनिट २) मागील हंगामातील गळीत उसाचे प्रतिटन १०० रुपये तसेच चालू गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक १०० रुपये प्रमाणे ऊसदर त्वरित जाहीर करावा, अन्यथा शनिवार (दि.९) पासून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर बेमुदत वजनकाटा बंद आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करीत चालू हंगामासाठी प्रतिटन ३ हजार २०० ऊसदराची घोषणा केली. गेल्या वर्षीच्या ऊसाला १०० रुपये देण्याचे आश्वासनही दिल्याचे स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर यांनी सांगितले. Udaya Sugar
दरम्यान, बांबवडे-सोनवडे युनिट २ चे व्यवस्थापक इस्माईल मुलाणी यांना बुधवारी भेटलेल्या स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील समन्वय बैठकीत ठरलेल्या मागील हंगामातील गळीत उसाचे प्रतिटन १०० रुपये तसेच चालू गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक १०० रुपये याप्रमाणे ऊसदराच्या तोडग्याची आठवण करून देत त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. Udaya Sugar
यावेळी कारखाना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत कार्यकारी संचालक योगेश पाटील यांच्याशी संवाद साधला. पाटील यांनीही यंदाची एफआरपी तोडणी वाहतूक वजा जाता ३ हजार ४२ रुपये देणे क्रमप्राप्त ठरत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान राखत यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन ३ हजार २०० रूपये ऊसदर देण्याची तयारी दर्शवली. इतकेच नव्हे तर तातडीने आपल्या स्वाक्षरीचे पत्रच स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाच्या हाती सोपवले. स्वाभिमानीनेही कारखाना व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, भैय्या थोरात, जयसिंग पाटील, अजित साळुंखे, राम लाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिटनाला एक किलो साखर देणार !
दरम्यान, सन २०२३/२४ चा गळीत हंगाम संपल्यावर रेव्हीन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार रक्कम उपलब्धता पाहून अधिकचा ऊसदर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे. शिवाय गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन एक किलो साखर सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना घरपोच देणार आहे. कार्यक्षेत्रातील ऊसकरी शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याला पुरवठा करावा, असे आवाहनही कार्यकारी संचालक योगेश पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा 

डॉ. आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरात!
कोल्हापूर : हातकणंगलेतील तासगाव येथे जनावरांच्या कळपात गव्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
कोल्हापूर: गारिवडे – बावेली येथील धामणी नदीवरील माती बंधारा फुटला

The post कोल्हापूर: उदय साखर कारखान्याचा ३२०० रुपये ऊसदर जाहीर appeared first on पुढारी.

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदय साखर कारखान्याने (अथणी शुगर युनिट २) मागील हंगामातील गळीत उसाचे प्रतिटन १०० रुपये तसेच चालू गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक १०० रुपये प्रमाणे ऊसदर त्वरित जाहीर करावा, अन्यथा शनिवार (दि.९) पासून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर बेमुदत वजनकाटा बंद आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने …

The post कोल्हापूर: उदय साखर कारखान्याचा ३२०० रुपये ऊसदर जाहीर appeared first on पुढारी.

Go to Source