हिंगोलीच्या पथकाची कुणबी-मराठा नोंदींची तहसिलनिहाय शोध मोहिम
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यात कुणबी-मराठा पुरावे लोकसंख्येच्या मानाने कमी प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाने गठीत केलेल्या सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या समितीने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हिंगोलीचे पथक छत्रपती संभाजीनगरातील पुराव्यांची जंत्री तहसिलनिहाय शोधत आहेl. बुधवारी या पथकाने तहसिलदार, नायब तहसिलदारांची बैठक घेत सुचना दिल्या. याशिवाय पथकाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. तर तालुकानिहाय पुरावे तपासले जात आहेत.
कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदी असलेल्या दस्तांची फेरतपासणी करावी, असे आदेश न्या. शिंदे समितीने दिल्यानंतर आता हिंगोलीहून आलेल्या पथकाने तालुकानिहाय अभिलेख कक्षातील आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. आणखी पुरावे शोधण्यासाठी तालुकानिहाय पुरावे उघडून पाहिले जात आहेत. सप्टेंबर, आॅक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यात जिल्हा प्रशासनाने १९ लाख ३८ हजार ११५ पुरावे तपासले होते. त्यात १ हजार २७८ कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आल्या आहेत. लोकसंख्येच्या मानाने छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूरमध्ये कमी पुरावे आढळून आले आहेत. त्यामुळे हिंगोलीतील अप्पर जिल्हाधिकारी प्रवीणकुमार धरमकर, उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा, अप्पर तहसीलदार एस. डी. सुरे यांचे पथक पुरावे शोधण्यासाठी मंगळवारी शहरात दाखल झाले आहे. ८ डिसेंबरपर्यंत हे पथक पुन्हा पुराव्यांची शोधाशोध करणार आहे. खासरापत्र, पाहणीपत्र, क-पत्रक, कूळ नोंदवही, १९५१ चे राष्ट्रीय रजिस्टर, हक्क नोंद पत्र, फेरफार पत्र, सातबारा, गाव नमुना, प्रवेश निर्गम नोंदवही, अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना नोंद, कारागृहातील नोंदी, गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्रार्इम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर, मुद्रांक विभागातील १३ प्रकारचे दस्तावेज, भूमिअभिलेखामधील सात दस्तावेज, मुंतखब आदी अभिलेखातील नोंदी घेण्याचे राहून गेले की काय याचा आढावा पथक घेत आहे. बुधवारी या पथकाने फुलंब्रीसह अन्य दोन तालुक्यातील तहसिल कार्यालयात पुराव्यांची तपासणी केली.
The post हिंगोलीच्या पथकाची कुणबी-मराठा नोंदींची तहसिलनिहाय शोध मोहिम appeared first on पुढारी.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यात कुणबी-मराठा पुरावे लोकसंख्येच्या मानाने कमी प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाने गठीत केलेल्या सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या समितीने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हिंगोलीचे पथक छत्रपती संभाजीनगरातील पुराव्यांची जंत्री तहसिलनिहाय शोधत आहेl. बुधवारी या पथकाने तहसिलदार, नायब तहसिलदारांची …
The post हिंगोलीच्या पथकाची कुणबी-मराठा नोंदींची तहसिलनिहाय शोध मोहिम appeared first on पुढारी.