नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देताना हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेकडो शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले.
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरे गटातर्फे मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना यावेळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. अवकाळी भागांचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांनी पिकविमा कंपन्यांकडून एक रुपयात पीक विमा काढला असून ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रार करण्याची शर्त आहे. पण कंपनीचे संकेतस्थळ तसेच हेल्पलाईन क्रमांक बंद आहे. अवकाळी पाऊस झाल्याचे माहिती असतानाही पीकविमा कंपन्या मदत करण्याची भुमिका घेत नसल्याचे दिसत नाही. त्यामुळे वीमा कंपन्या हेतुपुरस्कर शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे शासनाने विमा कंपनीना ताकीद देत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी आदी मागण्या करण्यात आली.
शालिमार येथील शिवसेना भवनपासून प्रारंभ झालेला मोर्चा नेहरु गार्डन, रेडक्राॅस सिग्नल, एमजी रोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चामध्ये पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनिल बागुल, माजी आमदार अनिल कदम, निर्मला गावित व योगेश घोलप, कुणाल दराडे, देवानंद बिरारी यांच्यासह अन्य पदाधिकारी, शिव सैनिक तसेच शेतकरी सहभागी झाले.
प्रमुख मागण्या…
-दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
-जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करावी
-जनावरांना खुटयावर चारा उपलब्ध करून द्यावा
-पिक विम्यातील जाचक अटी रद्द करा
-सरसकट पिकविम्याची रक्कम बाधित शेतकऱ्यांना मिळावी
-खरीप व रब्बी हंगामातील पिकांना लागू असलेला विमा सरसकट द्यावा
-कुठलेही निकष न पाहता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी
बैलगाड्या, ट्रॅक्टरने वेधले लक्ष
शिवसेना ठाकरे गटाने काढलेल्या माेर्चामध्ये नाशिक शहरालगतच्या गावांमधून मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले. यावेळी २५ बैलगाड्यांसह ट्रॅक्टर घेऊन मोर्चात शेतकऱ्यांनी लावलेल्या हजेरीमुळे साऱ्यांचेच लक्ष वेधले. मोर्चामुळे सीबीएस चाैक, अशोकस्तंभ, एमजी रोड आदी भागात मोठी वाहतूक कोंडी झाली.
शेतकऱ्यांमध्ये रोष
जिल्ह्यामध्ये २०२२ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, कांदे, कपाशी, टमाटे, कोबी, फ्लॉवर मुग, उडीद, गहू, बाजरी, सोयाबीन, मका, तूर, तीळ या पिकांचे माेठे नुकसान झाले होते. शासनाने
पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात आश्वस्त केले होते. मात्र, अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्यानेल शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याची यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
हेही वाचा :
Chh. Sambhajinagar : तेलवाडी अत्याचारप्रकरणी पैठण तहसीलवर आक्रोश मोर्चा
गुंतवणूक : ग्वार गम : वायदा बाजारातील ‘ट्रेंडिंग’ कमोडिटी!
Maharashtra politics : अशिष शेलारांनी घातलं गाऱ्हाणं, “त्यांचीच पनवती…”
The post नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा ‘आक्रोश’ appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देताना हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेकडो शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरे गटातर्फे …
The post नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा ‘आक्रोश’ appeared first on पुढारी.