पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता रणदीप हुड्डाने लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत मणिपूरमधील इंफाळ या ठिकाणी लग्न केले. (Randeep Hooda-Lin Laishram Reception) त्यांचे २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी मैतई पद्धतीने लग्न झाले. २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी एका ट्रॅडिशनल वेडिंग फंक्शनमध्ये कुटुंबीय आणि क्लोज फ्रेंड्स यांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले होते. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसले. आता त्यांच्या रिसेप्शनविषयीची माहिती समोर आलीय. (Randeep Hooda-Lin Laishram Reception)
संबंधित बातम्या –
CID Actor Dinesh Phadnis : ‘सीआयडीतील फ्रेडरिक’ दिनेश फडणीस यांना हार्ट ॲटॅक नाही, तर…
Animal Collection : रणबीरच्या ‘अॅनिमल’नं पकडली गती, ‘सॅम बहादूर’ची पिछेहाट; तिसऱ्या दिवशी ७१ कोटींची टप्पा पार
Omi Vaidya : ‘३ इडियट्स’ मधील ‘चतुर’ ओमी वैद्य दिसणार मराठी चित्रपटात
आता, रणदीप आणि लिन डिसेंबर, २०२३ मध्ये वेडिंग रिसेप्शन होस्ट करण्याच्या तयारीत आहेत. रणदीप-लिन मुंबईत रिसेप्शन पार्टी देणार आहेत. रिपोर्टनुसर, न्यूली वेड कपल रणदीप हुडा आणि लिन लॅशराम मुंबईत ग्रँड वेडिंग रिसेप्शन होस्ट करण्याच्या तयारीत आहेत.
रिपोर्टनुसार, सूत्राच्या माहितीनुसार, दोघे ११ डिसेंबर, २०२३ रोजी एक रिसेप्शन पार्टी देणार आहेत. सूत्राने हेदेखील सांगितलं की, रणदीप आणि लिनच्या परिवारातील सदस्यांशिवाय वेडिंग रिसेप्शनमध्ये चित्रपट इंडस्ट्रीतील जवळचे मित्र सहभागी होतील. रिपोर्टनुसार, रणदीप-लिनने रिसेप्शनमध्ये ट्रॅडिशनल एथनिक मणिपुरी आऊटफिट परिधान करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, रिसेप्शन कोणत्या ठिकाणी होणार, याविषयी माहिती समोर आलेली नाही.
रिसेप्शन पार्टीत कोणकोणते स्टार्स सहभागी होणार?
सूत्रांनुसार, सलमान खान, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा असे अनेक दिग्गज स्टार्स रिसेप्शन पार्टीत सहभागी होणार आहेत. दरम्यान, रणदीप आणि लिन यांनी आफ्टर वेडिंग पार्टीची झलक शेअर केली होती.
ट्रॅडिशनल लग्नानंतर रणदीप हुड्डा आणि नववधू लिन लॅशरामने मणिपूरमध्ये ऑफ्टर वेडिंग पार्टीदेखील आयोजित केली होती. या पार्टीतील फोटोदेखील सोशल मीडियावर व्हाय़रल झाले होते. फोटोमध्ये रणदीप-लिन ट्रॅडिशनल आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होते. या वेषात ते खूप सुंदर दिसत होते. रणदीपने गोल्डन कलरची शेरवानी परिधान केली होती. लिन लॅशराम यलो कलरच्या आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती.
View this post on Instagram
A post shared by Randeep Hooda (@randeephooda)
View this post on Instagram
A post shared by Randeep Hooda (@randeephooda)
The post रणदीप हुडाचे यादिवशी ग्रँड रिसेप्शन, जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता रणदीप हुड्डाने लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत मणिपूरमधील इंफाळ या ठिकाणी लग्न केले. (Randeep Hooda-Lin Laishram Reception) त्यांचे २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी मैतई पद्धतीने लग्न झाले. २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी एका ट्रॅडिशनल वेडिंग फंक्शनमध्ये कुटुंबीय आणि क्लोज फ्रेंड्स यांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले होते. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ …
The post रणदीप हुडाचे यादिवशी ग्रँड रिसेप्शन, जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी appeared first on पुढारी.