निमगाव दुडेत विजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील रशीद गुलाब शेख यांच्या दोन म्हशी रानात चरत असताना विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडल्या. रविवारी (दि. 3) दुपारी दोन वाजता ही घटना घडली. मागच्या रविवारी झालेल्या वादळी पावसात निमगाव दुडे-कवठे येमाई रस्त्याच्या कडेला शेतातील विजेचे दोन खांब खाली पडून तारा तुटल्या. अनेक वेळा महावितरणच्या … The post निमगाव दुडेत विजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

निमगाव दुडेत विजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील रशीद गुलाब शेख यांच्या दोन म्हशी रानात चरत असताना विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडल्या. रविवारी (दि. 3) दुपारी दोन वाजता ही घटना घडली. मागच्या रविवारी झालेल्या वादळी पावसात निमगाव दुडे-कवठे येमाई रस्त्याच्या कडेला शेतातील विजेचे दोन खांब खाली पडून तारा तुटल्या. अनेक वेळा महावितरणच्या कर्मचार्‍यांना कल्पना देऊनही कर्मचार्‍यांकडून दखल घेतली गेली नाही. वीजपुरवठा सुरूच राहिल्याने शेतात चरणार्‍या दोन म्हशींचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सुदैवाने म्हशींच्या मागे असलेले शेख हे थोडक्यात बचावले. स्थानिक रहिवासी दादाभाऊ थोरात यांनी तात्काळ या दुर्घटनेची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना कळविले. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वायरमनला वारंवार कल्पना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली. महावितरण विभागाकडून तत्काळ भरपाई मिळावी व दिरंगाई करणार्‍या अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी,अशी मागणी सरपंच शशिकला घोडे , माजी उपसरपंच अमोल घोडे यांनी केली. पंचनामा करून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकर्‍यास योग्य ती नुकसानभरपाई मिळवून दिली जाईल, असे आश्वासन महावितरणचे सहायक अभियंता राजेंद्र इंगळे
यांनी दिली.
हेही वाचा :

चिंता वाढली ! अत्यल्प पावसामुळे जिरायती भागात पाणीपातळी घटली
नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम

The post निमगाव दुडेत विजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू appeared first on पुढारी.

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील रशीद गुलाब शेख यांच्या दोन म्हशी रानात चरत असताना विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडल्या. रविवारी (दि. 3) दुपारी दोन वाजता ही घटना घडली. मागच्या रविवारी झालेल्या वादळी पावसात निमगाव दुडे-कवठे येमाई रस्त्याच्या कडेला शेतातील विजेचे दोन खांब खाली पडून तारा तुटल्या. अनेक वेळा महावितरणच्या …

The post निमगाव दुडेत विजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source