दुपारची डुलकी ठरते मेंदूसाठी लाभदायक
नवी दिल्ली : दुपारी जेवणावर आडवा हात मारला की, लगेचच अनेकजण आडवे होतात. अशी वामकुक्षी घेण्याची अनेकांना सवय असते. दुपारची झोप आरोग्यासाठी चांगली की वाईट याबाबत अनेक मतांतरं आहेत. दिवसा डुलकी किंवा पॉवर नॅप घेण्याबाबत अनेक शक्यता सांगितल्या जातात. काहींच्या मते, दुपारच्या वेळी झोपणं आरोग्यासाठी घातक असल्याचं सांगितलं जातं; तर काही लोक वामकुक्षीचे फायदे सांगतात. दरम्यान, यासंदर्भात आता एक नवीन संशोधन समोर आलं आहे. त्यानुसार अशी झोप मेंदूसाठी लाभदायकच ठरते!
नवीन संशोधनानुसार, दुपारच्या झोपेचा शरीराची ऊर्जा, विशेषत: मेंदूसोबत घनिष्ट संबंध असल्याचं समोर आलं आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन आणि युनिव्हर्सिटी पब्लिक ऑफ उरुग्वे येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात वामकुक्षी आणि मेंदू यांच्यात मजबूत संबंध आढळून आला. नव्या संशोधनानुसार, वामकुक्षी म्हणजेच दुपारच्या वेळेची डुलकी मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामुळे स्मृतिभ्रंश आणि न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांचा कमी धोका होतो, असं अभ्यासात आढळून आलं आहे.
संशोधनानुसार, नियमित वामकुक्षी घेतल्यामुळे मेंदूचं संकुचन होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याआधी डुलकीचे फायदेशीर परिणाम दिसून आले आहेत. पण, डुलकी आणि मेंदूच्या आरोग्याचा थेट संबंध सापडल्याचं पहिल्यांदाच समोर आलं आहे. लोकांच्या झोपण्याच्या सवयी निश्चित करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी 97 लोकांच्या डीएनए वर मँडेलियन रँडमाइजेशन तंत्राचा वापर केला. हे तंत्र शरीरासाठी घातक घटक आणि रोगांमधील संबंध तपासण्यासाठी वापरलं जातं.
या संशोधनामध्ये सहभागी लोकांच्या मनगटावर परिधान केलेल्या एक्सीलरोमीटरद्वारे रेकॉर्ड केलेल्या शारीरिक प्रक्रियांचं मोजमापांसह माहिती एकत्रित करण्यात आली. या अभ्यासात संशोधकांना असं आढळून आलं की, जे लोक डुलकी घेण्यास प्राधान्य देतात त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होतो. 30 मिनिटे किंवा त्याहून कमी वेळ डुलकी घेतल्यामुळे रात्रीच्या झोपेमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता कमी होते.
The post दुपारची डुलकी ठरते मेंदूसाठी लाभदायक appeared first on पुढारी.
नवी दिल्ली : दुपारी जेवणावर आडवा हात मारला की, लगेचच अनेकजण आडवे होतात. अशी वामकुक्षी घेण्याची अनेकांना सवय असते. दुपारची झोप आरोग्यासाठी चांगली की वाईट याबाबत अनेक मतांतरं आहेत. दिवसा डुलकी किंवा पॉवर नॅप घेण्याबाबत अनेक शक्यता सांगितल्या जातात. काहींच्या मते, दुपारच्या वेळी झोपणं आरोग्यासाठी घातक असल्याचं सांगितलं जातं; तर काही लोक वामकुक्षीचे फायदे सांगतात. …
The post दुपारची डुलकी ठरते मेंदूसाठी लाभदायक appeared first on पुढारी.