जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर ‘प्रतिक’ने वेधले लक्ष

अमरावती ; पुढारी वृत्‍तसेवा भारतीय प्रहार दिव्यांग कर्मचारी महासंघ आणि अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रहार दिव्यांग महाराष्ट्र श्री शरीरसौष्टव स्पर्धेचे आयोजन येथील योग भवन मध्ये करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. दिव्यांग श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून, तो मान यावेळेस अमरावतीला मिळाला आहे. स्पर्धेत अमरावतीसह वाशिम, … The post जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर ‘प्रतिक’ने वेधले लक्ष appeared first on पुढारी.
#image_title
जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर ‘प्रतिक’ने वेधले लक्ष


अमरावती ; पुढारी वृत्‍तसेवा भारतीय प्रहार दिव्यांग कर्मचारी महासंघ आणि अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रहार दिव्यांग महाराष्ट्र श्री शरीरसौष्टव स्पर्धेचे आयोजन येथील योग भवन मध्ये करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. दिव्यांग श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून, तो मान यावेळेस अमरावतीला मिळाला आहे. स्पर्धेत अमरावतीसह वाशिम, नागपूर, धाराशिव, औरंगाबाद, ठाणे, रायगड अकोलासह महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले.
या स्पर्धेत जगातील सर्वात लहान बॉडीबिल्डर होण्याचा मान ज्याच्या नावावर आहे तो प्रतिक मोहिते देखील उपस्थित होता. त्याची उपस्थिती ही स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरली. प्रतिकची उंची 3.3 फूट आहे. रायगडच्या प्रतीक मोहिते याने आपल्या कमी उंचीला आपली कमजोरी न मानता उलट जगातील सर्वात लहान बॉडीबिल्डर होण्याचा मान पटकावला आहे. 28 वर्षीय प्रतीकचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. प्रतिक हा एक जिम ट्रेनर आहे. प्रतीकच्या नावावर एक नव्हे तर तब्बल दोन जागतिक रेकॉर्ड आहे. एक म्हणजे जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर चा तर दुसरा म्हणजे एका मिनिटात 84 पुशअप मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.
हेही वाचा : 

Winter Session of Parliament | ‘तिसरी बार मोदी सरकार’ : भाजप खासदारांच्‍या घाेषणांनी सभागृह दणाणले 
Air Force News : हैदराबाद नजीक प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले, दोन वैमानिक गंभीर जखमी

cyclone michaung live: ‘मिचौंग’ चक्रीवादळ; तमिळनाडूसह चेन्नईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस 

The post जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर ‘प्रतिक’ने वेधले लक्ष appeared first on पुढारी.

अमरावती ; पुढारी वृत्‍तसेवा भारतीय प्रहार दिव्यांग कर्मचारी महासंघ आणि अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रहार दिव्यांग महाराष्ट्र श्री शरीरसौष्टव स्पर्धेचे आयोजन येथील योग भवन मध्ये करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. दिव्यांग श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून, तो मान यावेळेस अमरावतीला मिळाला आहे. स्पर्धेत अमरावतीसह वाशिम, …

The post जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर ‘प्रतिक’ने वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Go to Source