नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहराच्या तापमानाच्या पाऱ्यात रविवारी (दि. ३) किंचित वाढ होऊन तो १९.६ अंशांवर स्थिरावला. पण पाऱ्यातील या वाढीसोबत हवेतील गारवा कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवस ढगाळ हवामान कायम राहणार असले, तरी गारव्यामध्ये अधिक वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर नाशिक शहर व परिसरावर मागील चार दिवसांपासून … The post नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम appeared first on पुढारी.
#image_title

नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहराच्या तापमानाच्या पाऱ्यात रविवारी (दि. ३) किंचित वाढ होऊन तो १९.६ अंशांवर स्थिरावला. पण पाऱ्यातील या वाढीसोबत हवेतील गारवा कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवस ढगाळ हवामान कायम राहणार असले, तरी गारव्यामध्ये अधिक वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर नाशिक शहर व परिसरावर मागील चार दिवसांपासून पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पसरत आहे. तर रात्रीच्या वेळी थंड वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने शहरवासीयांना हूडहूडी भरते आहे. वातावरणातील या बदलाने शहरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. पहाटेच्या वेळी पडणाऱ्या धुक्याचा परिणाम हा सकाळी ८ पर्यंत कायम असल्याने वाहतुकीसह पादचाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे वाढत्या थंडीसोबत शहर-परिसरातील मैदाने, जॉगिंग ट्रॅक तसेच जिममध्ये नाशिककर गर्दी करत आहेत. दरम्यान शहराप्रमाणे ग्रामीण भागालाही थंडीची चाहूल लागली आहे.
द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये रविवारी (दि. ३) किमान तापमानाचा पारा १९ अंश सेल्सिअस नोंदविला. पहाटे पडणाऱ्या दवबिंदूंपासून द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणीही थंडीचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्यांभोवती गर्दी होत आहे.
हेही वाचा :

पुणे जिल्ह्यात लोकसहभागातून 17 वनराई बंधारे तयार
मंगोलियात रक्तासारखे लाल झाले आकाश!

The post नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहराच्या तापमानाच्या पाऱ्यात रविवारी (दि. ३) किंचित वाढ होऊन तो १९.६ अंशांवर स्थिरावला. पण पाऱ्यातील या वाढीसोबत हवेतील गारवा कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवस ढगाळ हवामान कायम राहणार असले, तरी गारव्यामध्ये अधिक वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर नाशिक शहर व परिसरावर मागील चार दिवसांपासून …

The post नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम appeared first on पुढारी.

Go to Source