पुढारी ऑनलाईन डेस्क : मिझोरम विधानसभेमध्ये लाल दुहोमा यांच्या नेतृत्वाखाली झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) पक्षाने निर्णायक बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. या पक्षाने राज्यातील ४० पैकी २६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) ने केवळ ११ जागांवर आघाडी आहे. भाजपने २ आणि काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. झोरम पीपल्स’ने पूर्ण बहुमताकडे वाटचाल केल्याचे स्पष्ट होत असल्याने झेडपीएमचे प्रमुख आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लालदुहोमा मिझोरामचे पुढील मुख्यमंत्री हाेणार हे आता स्पष्ट होत आहे. माजी आयपीएस अधिकारी असलेले ७४ वर्षीय लालदुहोमा यांच्याबद्दल जाणून घेवूया…
संबंधित बातम्या :
मिझोरममध्ये नवख्या ‘झोरम पीपल्स’ची कमाल
छत्तीसगडमध्ये विजय बघेल, रमणसिंग मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत
”आजच्या हॅट्रिकने २०२४ मध्ये भाजपच्या हॅट्रिकची गॅरंटी” : पीएम मोदी
मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या ४० जागांच्या विधानसभेसाठी विविध पक्षांनी निवडणूक लढवली. यामध्ये भाजप, त्याचा मित्रपक्ष मिझो नॅशनल फ्रंट (MNF) आणि काँग्रेसमध्ये खरी लढत होती. मात्र लालदुहोमा यांच्या नेतृत्वाखालील ZPM ने भ्रष्टाचार, रोजगार आणि विकासाच्या मुद्द्यावर आवाज उठवत निवडणूक लढवली. सध्याच्या आकडेवारीनुसार सत्ताधारी एमएनएफला धक्का देत झेडपीएमने मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यापासून घेतलेली आघाडी कायम राखली आहे.
आयपीएस अधिकारी ते लाेकसभा खासदार
लालदुहोमा यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९४९ रोजी मिझोराममधील तुळपुई गावात शेतकरी कुटुंबात झाला. चार भावंडांमध्ये ते सर्वात लहान खवजळ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेतले. १९७२ मध्ये त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. संध्याकाळच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. १९७२ ते १९७७ या काळात लालदुहोमा यांनी मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सहाय्यक म्हणून काम केले. यानंतर १९७७ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उर्त्तीण झाले. १९७७ मध्ये ते भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) दाखल झाले. त्यांची नियुक्ती गोवा येथे झाली. गोव्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तेथील गुन्हेगारी आणि तस्करांवर धडक कारवाई केली. त्यांची कामगिरी लक्षवेधी ठेली. यामुळे १९८२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा प्रभारी म्हणून त्यांची नवी दिल्ली येथे बदली झाली. त्यांना पोलीस उपायुक्त म्हणून विशेष बढती देण्यात आली. ते राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखालील १९८२ आशियाई खेळांच्या आयोजन समितीचे सचिवही होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे सुरक्षा सेवेतून राजीनामा देऊन, ते १९८४ मध्ये मिझोराममधून त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. ते खासदार म्हणून निवडून आले.
पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत अपात्रत हाेणारे देशातील पहिले खासदार
१९८६ मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. मात्र १९८५ च्या पक्षांतर विरोधी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन ठरले. लोकसभा अध्यक्षांनी २४ नोव्हेंबर १९८८ रोजी त्यांना अपात्र ठरवले आणि त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या पक्षाचे सदस्यत्व सोडून दिल्याबद्दल भारतातील पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्र ठरविले जाणारे ते देशातील पहिले खासदार बनले.
झोरम पीपल्स मूव्हमेंटची स्थापना
यानंतर १९८६ मध्ये त्यांनी विद्यार्थी संयुक्त कृती समिती आणि इतर राजकीय पक्षांनी समर्थित शांतता समितीची स्थापना केली. ३० जून रोजी मिझोराम शांतता करारावर झाला. मिझोराममधील आंदोलन संपुष्टात आले. त्याचबरोबर मिझो नॅशनल फ्रंट हा एक मान्यताप्राप्त राजकीय पक्ष झाला. लालदुहोमा काही काळ सल्लागार म्हणून MNF मध्ये सामील झाले, परंतु लवकरच त्यांच्यापासून वेगळे होऊन मिझो नॅशनल फ्रंटची स्थापना केली, ज्याचे नाव झोरम नॅशनलिस्ट पार्टी असे ठेवण्यात आले, १९९७ मध्ये. ZNP उमेदवार म्हणून, ते २००३ च्या निवडणुकीत रातू येथून मिझोराम विधानसभेवर निवडून आले.
२०१८ विधानसभा त्याचा पक्ष झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) या युती पक्षात सामील झाला. पक्षाने त्यांना अधिकृतपणे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले. युती पक्षाला त्यावेळी अधिकृत पक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळू शकली नाही, म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. ते दोन मतदारसंघातून निवडून आले. त्यांची मिझोरम विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून निवड झाली. २०१९ मध्ये झोराम पीपल्स मूव्हमेंट नोंदणीकृत राजकीय पक्ष झाला.
पुन्हा पक्षांतर बंदी कायदान्वये कारवाई
सप्टेंबर २०२० मध्ये मिझो नॅशनल फ्रंट या सत्ताधारी पक्षाच्या १२ आमदारांनी मिझोराम विधानसभेचे अध्यक्ष लालरिन्लियाना सायलो यांना निवेदन सादर केले की, लालदुहोमा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्यावर ZPM पक्षाचे नेते म्हणून काम केले आहे. या आधारावर पक्षांतरविरोधी कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरविण्यात आले. मिझोराम विधानसभेतून किंवा भारतातील कोणत्याही राज्य विधानसभेतून अपात्र ठरलेले ते पहिले आमदार ठरले. यानंतर १७ एप्रिल २०२१ रोजी सेरछिप मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत लालदुहोमा पुन्हा निवडून आले. आता २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत लालदुहोमा हे ZPM चे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
हेही वाचा :
तीन राज्यांमधील पराभवाचा राग सभागृहात काढू नका : PM मोदींचा विराेधकांना टोला
आता १२ राज्यांमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता!, जाणून घ्या राज्यनिहाय ‘सत्ता’कारण
The post गोव्यातील ‘आयपीएस’ ते मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार, जाणून घ्या लालदुहोमा यांच्याविषयी… appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : मिझोरम विधानसभेमध्ये लाल दुहोमा यांच्या नेतृत्वाखाली झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) पक्षाने निर्णायक बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. या पक्षाने राज्यातील ४० पैकी २६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) ने केवळ ११ जागांवर आघाडी आहे. भाजपने २ आणि काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. झोरम पीपल्स’ने …
The post गोव्यातील ‘आयपीएस’ ते मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार, जाणून घ्या लालदुहोमा यांच्याविषयी… appeared first on पुढारी.