आदर्श शिंदेच्या आवाजतील ‘छापा काटा’ गाणे भुरळ घालणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार मकरंद अनासपूरे आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा’ ६ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आणि अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ तसेच सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या गाण्यांना रसिकांनी पसंती दर्शवली आहे. त्याच पद्धतीने या गाण्यालाही अपेक्षेहून जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळणार आहे.(Chaapa Kaata Movie ) हा चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर आणि गाणी जोरदार धुमाकूळ घालत आहेत. (Chaapa Kaata Movie )
संबंधित बातम्या –
Katrina Kaif : ‘रेड सी फेस्टिव्हल’मध्ये कॅटरिना कैफचा फॅशनेबल अंदाज
The Dirty Picture : विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ची १२ वर्षे, खास फोटो पाहा
Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यन पुन्हा बनणार ‘रूह बाबा’; तब्बूचा पत्ता कट
‘छापा काटा’ चित्रपट ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत करत आहे. चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. आपल्या लोकप्रिय पहाडी आवाजाच्या शैलीत आदर्श शिंदे यांनी या गाण्याचे गायन केले आहे. तसेच ‘छापा काटा’ गाण्याचे संगीत दिग्दर्शन गौरव चाटी यांनी केले असून शब्द शिवम बारपांडे यांनी दिले आहेत.
The post आदर्श शिंदेच्या आवाजतील ‘छापा काटा’ गाणे भुरळ घालणार appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार मकरंद अनासपूरे आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा’ ६ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आणि अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ तसेच सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या गाण्यांना रसिकांनी …
The post आदर्श शिंदेच्या आवाजतील ‘छापा काटा’ गाणे भुरळ घालणार appeared first on पुढारी.