निवडणुकीच्या कव्हरेजमध्ये ‘पुढारी न्यूज’ची बाजी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक म्हटलं की पुढारी आणि पुढारी म्हटलं की निवडणूक हे सूत्र प्रिंट मीडियामध्ये रुजलंच आहे. पण आता चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजमध्ये पुढारी न्यूज या नव्याकोर्‍या न्यूज चॅनलने दमदार कामगिरी नोंदवली आहे. प्रचारकाळातील ग्राऊंड रिपोर्ट, निकालांच्या बातम्या आणि निकालाचं विश्लेषण सर्वच बाबतीत पुढारी न्यूज चॅनलनं बाजी मारली. निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेश, … The post निवडणुकीच्या कव्हरेजमध्ये ‘पुढारी न्यूज’ची बाजी appeared first on पुढारी.
#image_title

निवडणुकीच्या कव्हरेजमध्ये ‘पुढारी न्यूज’ची बाजी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक म्हटलं की पुढारी आणि पुढारी म्हटलं की निवडणूक हे सूत्र प्रिंट मीडियामध्ये रुजलंच आहे. पण आता चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजमध्ये पुढारी न्यूज या नव्याकोर्‍या न्यूज चॅनलने दमदार कामगिरी नोंदवली आहे. प्रचारकाळातील ग्राऊंड रिपोर्ट, निकालांच्या बातम्या आणि निकालाचं विश्लेषण सर्वच बाबतीत पुढारी न्यूज चॅनलनं बाजी मारली.
निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांतून पुढारी न्यूजचे प्रसन्न जोशी यांनी धावता दौरा करत सखोल वार्तांकन केले. त्यावेळी त्या त्या राज्यांमध्ये नेमके कोणते मुद्दे, लोक कोणाशी जोडले जात आहेत आणि कोणाला साथ देतील, याची मांडणी थेट लाईव्ह शोंमधूनही करण्यात आली. जयपूरच्या रस्त्यांपासून ते रायपूरच्या मैदानांपर्यंत, इंदूरच्या पोह्यांपासून ते हैद्राबादच्या बिर्याणीपर्यंत…प्रसन्न याने कव्हरेजच्या रेंजमध्ये प्रत्येकाला घेतले. त्या त्या राज्यातील राजकीय नेत्यांनी खुल्या मनानं साथ दिली. एक्झिट पोलवरील सखोल चर्चा आणि निकालाच्या दिवशी वेगवान आणि विश्वसनीय निकालासह दिग्गज नेते आणि तज्ज्ञांसह केलेल्या अचूक विश्लेषणातून पुढारी न्यूजने वेगळा ठसा उमटवला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणात जाऊन प्रचारकाळात निवडणुकीचं कव्हरेज करणारी पुढारी न्यूज ही मराठीतील एकमेव वृत्तवाहिनी ठरली.
पुढारी न्यूजच्या ’मतसंग्राम’ कार्यक्रमात प्रसन्न जोशी यांनी चार राज्यांतून सादर केलेला रिपोर्ट माहितीपूर्ण ठरला. तर निकालाच्या दिवशी लक्षवेधी ग्राफिक्ससह केलेले आकर्षक सादरीकरण वेगळेपणा सिद्ध करणारे ठरले. याशिवाय राजकीय नेते आणि तज्ज्ञ विश्लेषकांसह केलेली चर्चा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली.
मतमोजणीच्या दिवशी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांत पुढारी न्यूजच्या तीन रिपोर्टर्सनी थेट मतमोजणी केंद्राबाहेरून वार्तांकन केलं. याशिवाय दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी राजधानीतील घडामोडी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे, दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार, दिल्लीतून ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम, भोपाळमधून ज्येष्ठ पत्रकार अजय बोकील, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे सल्लागार श्रीकांत पाटील यांनी चर्चेत सहभागी होऊन अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं. प्रसन्न जोशी, नम्रता वागळे, गुरुप्रसाद जाधव आणि यामिनी दळवी यांच्या शैलीदार अँकरिंगने निकालाच्या कव्हरेजची रंगत वाढली.
अल्पावधीतच पुढारी न्यूजचा लौकिक
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केलेल्या ग्राऊंड झीरो रिपोर्टिंग आणि अभ्यासपूर्ण, शैलीदार विश्लेषणातून ‘पुढारी म्हणजेच निवडणूक’ हा लौकीक पुढारी न्यूज वाहिनेने अल्पावधीतच मिळवला.
The post निवडणुकीच्या कव्हरेजमध्ये ‘पुढारी न्यूज’ची बाजी appeared first on पुढारी.

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक म्हटलं की पुढारी आणि पुढारी म्हटलं की निवडणूक हे सूत्र प्रिंट मीडियामध्ये रुजलंच आहे. पण आता चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजमध्ये पुढारी न्यूज या नव्याकोर्‍या न्यूज चॅनलने दमदार कामगिरी नोंदवली आहे. प्रचारकाळातील ग्राऊंड रिपोर्ट, निकालांच्या बातम्या आणि निकालाचं विश्लेषण सर्वच बाबतीत पुढारी न्यूज चॅनलनं बाजी मारली. निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेश, …

The post निवडणुकीच्या कव्हरेजमध्ये ‘पुढारी न्यूज’ची बाजी appeared first on पुढारी.

Go to Source