शिंदेंना गटनेतेपदावरून हटवायला 30 जूनची वाट का पाहिली?

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरोधात ठाकरे गटाने 24 जून 2022 रोजी अपात्रता याचिका दाखल केली; मग एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 30 जूनपर्यंत वाट का पाहिली, असा प्रश्न करत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत मवाळ भूमिका स्वीकारल्याचा दावा शनिवारच्या उलटतपासणीत केला. त्यावर ठाकरे गटाचे … The post शिंदेंना गटनेतेपदावरून हटवायला 30 जूनची वाट का पाहिली? appeared first on पुढारी.
#image_title

शिंदेंना गटनेतेपदावरून हटवायला 30 जूनची वाट का पाहिली?

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरोधात ठाकरे गटाने 24 जून 2022 रोजी अपात्रता याचिका दाखल केली; मग एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 30 जूनपर्यंत वाट का पाहिली, असा प्रश्न करत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत मवाळ भूमिका स्वीकारल्याचा दावा शनिवारच्या उलटतपासणीत केला. त्यावर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेना कधीच हिंदुत्वाच्या विचारांपासून लांब जाऊ शकत नसल्याचे सांगत जेठमलानी यांचा दावा फेटाळून लावला.
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर सुनावणी पार पडली. शनिवारी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू आणि कार्यालयीन सचिव विजय जोशी यांची उलटतपासणी घेण्यात आली. ठाकरे गटाची सुनावणी आता पूर्ण झाली आहे. 7 डिसेंबरपासून ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे शिंदे गटाच्या 6-7 आमदारांची उलटतपासणी घेतील.
आजच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी शिवसेना पक्षप्रमुखपद, हिंदुत्व, व्हिप आदी प्रश्नांचा भडिमार केला. यातील बहुतांश प्रश्नांवर सुनील प्रभू यांनी आपल्याला आठवत नसल्याचे सांगत अधिक भाष्य करणे टाळले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली? काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीवर टीका केली का, असे प्रश्न विचारले असता त्यावर उत्तर देता येणार नाही, असे प्रभू म्हणाले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी नाही, तर युती केली, हे सत्य असल्याचे प्रभू यांनी सुनावले.
हिंदुत्वावरून केलेले दावे खोडले
शिवसेनेच्या विचारधारेत हिंदुत्वाचा समावेश होता का, बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट नावाने ओळखले जाते, हे माहीत आहे का, असे प्रश्न जेठमलानी यांनी केले. त्यावर हे सर्व जगाला माहीत असल्याचे उत्तर प्रभू यांनी दिले. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका मवाळ करण्याचा निर्णय घेतला होता का, या जेठमलानी यांच्या प्रश्नावर हे धादांत खोटे आहे, असे उत्तर प्रभू यांनी दिले. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कधीही हिंदुत्वाच्या विचारांपासून लांब जाऊ शकत नाही, असे प्रभू यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंचा तो ई-मेल सादर
ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना ज्या ई-मेलवरून पक्षादेश पाठवला तो बनावट असल्याचा दावा काही दिवसांपासून सुरू होता. अखेर आजच्या सुनावणीत ठाकरे गटाने विधिमंडळाची डायरी सादर केली. या डायरीतील शिंदे यांचा ई-मेल आणि ज्यावर पक्षादेश पाठवला तो मेल एकच असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी या ई-मेलसंदर्भात ज्यांनी तक्रार केली, त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची हिंमत का दाखवली नाही, असा सवाल ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाला केला.
तुम्ही ‘अपसेट’ झालात का?
या सुनावणीच्या दरम्यान महेश जेठमलानी यांनी आज अनिल देसाई आले आहेत का, अशी विचारणा केली. तेव्हा मागील बाकावर बसलेले अनिल देसाई म्हणाले की, हो, आलो आहे; पण, मी आल्याने तुम्ही ‘अपसेट’ झाला आहात का, असा प्रश्न देसाई यांनी केला. त्यावर सभागृहात खसखस पिकली.
सुनावणीतील प्रश्नोत्तरे
महेश जेठमलानी : आपल्या प्रतिज्ञापत्रानुसार 25 जून 2022 रोजी कुठलीही राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा प्रतिनिधी सभा झालेली नाही. तसेच तेव्हा कुठला ठरावही संमत झाला नाही.
सुनील प्रभू : हे खोटे आहे.
जेठमलानी : या बैठकीची कोणतीही नोटीस प्रतिवाद्यांना देण्यात आलेली नव्हती.
प्रभू : मला आठवत नाही.
जेठमलानी : शिवसेनेत पक्षप्रमुख या नावाचे पद अस्तित्वात नाही.
प्रभू : ऑन रेकॉर्ड आहे.
जेठमलानी : शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख हे पद नाही किंवा या पदावरील व्यक्तीचे निर्णय बंधनकारक नाहीत.
प्रभू : ऑन रेकॉर्ड आहे.
जेठमलानी : शिवसेना राजकीय पक्षात राष्ट्रीय कार्यकारिणी ही निर्णय घेणारी मुख्य संस्था आहे. तुम्ही म्हणता तसे पक्षप्रमुख नव्हे.
प्रभू : हे खोटे आहे.
जेठमलानी : तुम्ही केलेले संघटनात्मक बदल हे पक्षांतर्गत लोकशाहीच्या तत्त्वांविरोधात आहेत.
प्रभू : हे खरे नाही.
जेठमलानी : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरोधात प्रभू यांनी 24 जून 2022 अपात्रता याचिका दाखल केली. मग, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी 30 जूनपर्यंत वाट का पाहिली?
प्रभू : ऑन रेकॉर्ड आहे; पण आता मला आठवत नाही.
यावर आपल्याला प्रश्न समजला ना, असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनील प्रभू यांना केला आणि वकिलांनी विचारलेला प्रश्न प्रभू यांना उलगडून सांगितला. त्यावरही प्रभू यांनी ‘मला आता आठवत नाही,’ असे उत्तर कायम ठेवले. त्यावर साक्षीदाराकडून वकिलांच्या प्रश्नाला उत्तर दिले गेले नसल्याची नोंद अध्यक्षांनी केली.
जेठमलानी : पक्षाच्या पूर्वीच्या घटनेतील तरतुदींमुळे उद्धव ठाकरे यांना मनमानी तसेच घटनाविरोधी तरतुदी करता आल्या नसत्या.
प्रभू : हे खोटे आहे.
जेठमलानी : आपण शिवसेना आमदारांना 4 जुलै 2022 रोजी सरकारविरोधात मतदान करण्याचा व्हिप का काढला?
प्रभू : ज्या आमदारांना व्हिप बजावला होता, त्यांनी पक्षविरोधी कृत्य केले होते. मविआ सरकारविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे तो विश्वासदर्शक ठराव होता. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करावे ही भूमिका होती. म्हणून पूर्ण वेळ उपस्थित राहून भाजपने जो विश्वासदर्शक ठराव मांडला होता, त्याविरुद्ध महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्यासाठी मी व्हिप काढला होता.
दरम्यान, सुनील प्रभू यांनी उत्तरात बदल करण्याची विनंती अध्यक्षांकडे मागितली. त्यांच्या परवानगीनंतर प्रभू यांचे सुधारित उत्तर नोंदविण्यात आले.
प्रभू : सर्वच आमदारांना व्हिप बजावला होता. काही आमदार पक्षविरोधी मतदान करणार होते, असे समजले. विश्वासदर्शक ठराव भारतीय जनता पक्षाने मांडला होता. या ठरावाला महाविकास आघाडीने विरोध दर्शवला होता. शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत होती. म्हणून विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करावे व महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करावे म्हणून हा व्हिप काढण्यात आला होता.
जेठमलानी : 3 जुलै 2022 रोजीच्या अधिवेशनात आपण उपस्थित होता का?
प्रभू : आता मला नेमके आठवत नाही. 3 जुलैचे मला बघावे लागेल.
जेठमलानी : अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावेळी आपण हजर होतात का?
प्रभू : मी हजर होतो, ऑन रेकॉर्ड आहे.
जेठमलानी : मग तुम्ही विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले का?
प्रभू : हो, मी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले.
जेठमलानी : निवडणूकपूर्व युतीच्या विरोधात आपण मतदान करून शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे का?
प्रभू : हे खोटे आहे.
जेठमलानी : 2022 रोजीची अपात्रता याचिकेतील ठरावाची प्रत आपल्याला कशी व केव्हा मिळाली?
प्रभू : आता आठवत नाही.
जेठमलानी : आपण 21 जून 2022 रोजी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली होती का?
प्रभू : आता आठवत नाही.
जेठमलानी : शिवसेना पक्षाच्या विचारधारेत हिंदुत्वाचा समावेश होता का?
प्रभू : हो, नक्की आहे.
जेठमलानी : बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट नावाने ओळखले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का?
प्रभू : हे सर्व जगाला माहिती आहे.
जेठमलानी : तुमच्या माहितीनुसार शिवसेना राजकीय पक्ष किंवा शिवसेना पक्षप्रमुख यांनी हिंदुत्वाची भूमिका मवाळ करण्याचा निर्णय घेतला होता का?
प्रभू : हे धादांत खोटे आहे. शिवसेना कधीही हिंदुत्वाच्या विचारांपासून लांब जाऊ शकत नाही.
जेठमलानी : उद्धव बाळासाहेब ठाकरे हा राजकीय पक्ष नसून राजकीय नेत्यांचा समूह आहे.
प्रभू : हे खरं नाही.
जेठमलानी : हा पक्ष कधी स्थापन केला?
प्रभू : मला माहीत नाही, म्हणजे मला आता आठवत नाही.
The post शिंदेंना गटनेतेपदावरून हटवायला 30 जूनची वाट का पाहिली? appeared first on पुढारी.

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरोधात ठाकरे गटाने 24 जून 2022 रोजी अपात्रता याचिका दाखल केली; मग एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 30 जूनपर्यंत वाट का पाहिली, असा प्रश्न करत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत मवाळ भूमिका स्वीकारल्याचा दावा शनिवारच्या उलटतपासणीत केला. त्यावर ठाकरे गटाचे …

The post शिंदेंना गटनेतेपदावरून हटवायला 30 जूनची वाट का पाहिली? appeared first on पुढारी.

Go to Source