‘बिद्री’साठी आज मतदान
बिद्री : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची सर्व तयारी झाली असून रविवारी (दि. 3) मतदान होत आहे. 173 मतदान केंद्रांवर साहित्य रवाना झाले आहे. मतमोजणी मंगळवारी होणार आहे.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजता रमणमळा, कोल्हापूर येथे निवडणूक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे व निवडणूक निर्णय अधिकारी युसूफ शेख यांनी अधिकार्यांची बैठक घेऊन निवडणूक कामकाजाची उजळणी माहिती दिली. यानंतर निवडणुकीचे साहित्य बूथ कर्मचार्यांच्या ताब्यात देण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजता निर्धारित वाहनातून कर्मचारी रवाना झाले. दुपारी दीडपर्यंत निवडणूक बूथवर अधिकारी कर्मचारी पोहोचले असून मतदान केंद्राची तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
The post ‘बिद्री’साठी आज मतदान appeared first on पुढारी.
बिद्री : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची सर्व तयारी झाली असून रविवारी (दि. 3) मतदान होत आहे. 173 मतदान केंद्रांवर साहित्य रवाना झाले आहे. मतमोजणी मंगळवारी होणार आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता रमणमळा, कोल्हापूर येथे निवडणूक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे व निवडणूक …
The post ‘बिद्री’साठी आज मतदान appeared first on पुढारी.