#Melodi सेल्फीवर पीएम मोदींची प्रतिक्रिया, फोटो रिट्विट

#Melodi सेल्फीवर पीएम मोदींची प्रतिक्रिया, फोटो रिट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) जागतिक हवामान शिखर परिषद (COP28) आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक बडे नेते दुबईला पोहोचले. दरम्यान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या देखील या परिषदेत सहभागी झाल्या. या परिषदेदरम्यान मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा सेल्फी फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हाच फोटो पीएम मोदी यांनी रिट्विट करत एक संदेश देखील शेअर केला आहे. (#Melodi)
पीएम मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ट्विटरवर (आताचे ‘X’) शेअर केलेला सेल्फी पुन्हा त्यांच्या अधिकृत X सोशल मीडिया अकाऊंटवरून रिट्विट केला आहे. या फोटोसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायी असते’, असे म्हटले आहे. (#Melodi)

Meeting friends is always a delight. https://t.co/4PWqZZaDKC
— Narendra Modi (@narendramodi) December 2, 2023

#Melodi : मेलोनी यांनी मोदींसोबतचा फोटो शेअर करत दिला ‘हा’ संदेश
जागतिक हवामान शिखर परिषदे दरम्यान इटलीच्या पंतप्रधान मेलोनी (#Melodi) यांनी हा सेल्फी क्लिक केला आहे. या फोटोत दोघेही हसत आहेत. मेलोनी यांनी नंतर हा सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. त्यांनी कॅप्शमध्ये ‘COP28 मधील चांगले मित्र’ असे लिहिले आहे. #Melodi या हॅशटॅगचाही त्यांनी वापर केला आहे. (#Melodi)
पीएम मोंदींसोबत मेलोनी यांचे परिषदेतील फोटो, व्हिडिओ व्हायरल
यापूर्वी COP28 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांच्या फोटोशूटमध्येही पीएम मोदी आणि मेलोनी (#Melodi) यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दोघांचे एकत्र हसताना आणि बोलतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. दुबईत आयोजित COP28 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी शुक्रवारी (दि.१) रात्री भारताकडे रवाना झाले. त्यांनी एक्सवर ‘धन्यवाद दुबई’ असं म्हटले आहे. COP28 शिखर परिषद ३० नोव्हेंबर पासून ते १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पीएम मोदी गुरुवारी दुबईला गेले होते. (#Melodi)
काय आहे COP ? (#Melodi)
COP म्हणजे असे देश ज्यांनी १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान करारावर स्वाक्षरी केली होती. सीओपीची ही २८ वी बैठक आहे. म्हणून याला COP28 म्हटले जात आहे. COP28 पृथ्वीच्या तापमानातील वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट राखेल अशी अपेक्षा आहे. २०१५ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या करारात सुमारे २०० देशांमध्ये यावर सहमती झाली होती. इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान निरीक्षण संस्थेच्या म्हणण्यानुसार, १.५ अंश सेल्सिअस हे एक महत्त्वाचे लक्ष्य आहे, ज्याद्वारे हवामान बदलाचे धोकादायक परिणाम थांबवले जाऊ शकतात.
हेही वाचा:

भारतात २०२८ मध्ये COP33 परिषद – PM मोदींचा प्रस्ताव
COP28 हा परिपूर्ण उपाय नाही, कष्ट घ्यावे लागणार’
गरीब, महिला, युवा, शेतकरी यांना बळकट करणार : पंतप्रधान मोदी

The post #Melodi सेल्फीवर पीएम मोदींची प्रतिक्रिया, फोटो रिट्विट appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) जागतिक हवामान शिखर परिषद (COP28) आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक बडे नेते दुबईला पोहोचले. दरम्यान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या देखील या परिषदेत सहभागी झाल्या. या परिषदेदरम्यान मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा सेल्फी …

The post #Melodi सेल्फीवर पीएम मोदींची प्रतिक्रिया, फोटो रिट्विट appeared first on पुढारी.

Go to Source