शुक्रवार पेठेतील तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन तरुणांच्यातील भांडणातून पंचगंगा तालीमसमोर चौघा तरुणांनी धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात मुकुंद गिरीष पोवार (वय 17, रा. पंचगंगा तालीम शुक्रवार पेठ) हा महाविद्यालयीन तरुण जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मुकुंद पोवार हा शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकतो. त्याचे महाविद्यालयातील काही तरुणांशी भांडण झाले होते. या भांडणातूनच शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या चौघा तरुणांनी मुकुंदला घराबाहेर बोलवून घेतले. त्यांच्यात पुन्हा वादावादीला सुरुवात झाली.
काही वेळानंतर त्या चौघानी मुकुंदला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे असलेल्या धारदार शस्त्रांनी मुकुंदवर हल्ला केला. या हल्ल्यात मुकुंदच्या डोक्याला मार लागला आहे. यावेळी मुकुंदचे वडील गिरीष पोवार हे भांडण सोडवत असताना त्यांनादेखील या चौघांनी ढकलून दिले आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
The post शुक्रवार पेठेतील तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला appeared first on पुढारी.
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन तरुणांच्यातील भांडणातून पंचगंगा तालीमसमोर चौघा तरुणांनी धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात मुकुंद गिरीष पोवार (वय 17, रा. पंचगंगा तालीम शुक्रवार पेठ) हा महाविद्यालयीन तरुण जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत समजलेली माहिती अशी की, मुकुंद …
The post शुक्रवार पेठेतील तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला appeared first on पुढारी.