भारतातही वाढले मलेरियाचे रुग्ण

नवी दिल्ली : देशात अलीकडच्या काळात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया आदी आजारांचा फैलाव वाढला आहे. जगात 2022 मध्ये नोंदवलेल्या 52 लाख मलेरियाच्या रुग्णांपैकी 66 टक्के रुग्ण भारतात आढळल्याची माहिती माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही आकडेवारी दिली आहे. आग्नेय आशियातील कोणत्याही देशासाठी ही संख्या सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली ही 2020 सालची … The post भारतातही वाढले मलेरियाचे रुग्ण appeared first on पुढारी.
#image_title

भारतातही वाढले मलेरियाचे रुग्ण

नवी दिल्ली : देशात अलीकडच्या काळात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया आदी आजारांचा फैलाव वाढला आहे. जगात 2022 मध्ये नोंदवलेल्या 52 लाख मलेरियाच्या रुग्णांपैकी 66 टक्के रुग्ण भारतात आढळल्याची माहिती माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही आकडेवारी दिली आहे. आग्नेय आशियातील कोणत्याही देशासाठी ही संख्या सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली ही 2020 सालची आकडेवारी असून सध्या देशात मलेरिया आटोक्यात आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून 2023 चा वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2022 साली जगभरात सुमारे 24.9 कोटी जणांना मलेरियाची लागण झाल्याचा अंदाज आहे. 2019 साली 23.3 कोटी जणांना मलेरियाची जगभरात लागण झाली होत. कोरोना महामारीची घोषणा होण्यापूर्वीच 1.6 कोटी मलेरियाचे रुग्ण होते. कोव्हिडमुळे झालेला औषधांचा तुटवडा, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतील विलंब, हवामान बदलांचे परिणाम, संसाधनांची मर्यादा यासारख्या वाढत्या धोक्यांचा सामना मलेरिया आजारावर नियंत्रण मिळवताना त्यावेळी करावा लागला होता.
हवामान बदलांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामही मलेरियाच्या वाढत्या प्रसारावर झाल्याचे अहवालात दिसून येत आहे. 2022 मध्ये मलेरियामुळे झालेल्या मृत्यूपैकी 94 टक्के मृत्यू इंडोनेशियासह भारतात झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये पाकिस्तानमध्ये मलेरिया संसर्गाची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पाकिस्ताननंतर इथिओपिया, नायजेरिया, युगांडा आणि पापुआ न्यू गिनीमध्ये देखील मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
भारतात जरी यावर्षी मलेरियाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं पहायला मिळालं असलं तरी गेल्या कित्येक दशकांपासून मलेरिया हे एक आव्हान म्हणून देशासमोर उभं आहे. भारताचा समावेश जगातील सर्वात जास्त मलेरियाच्या रुग्णांची संख्या असलेल्या देशांत होतो. आफ्रिका खंडाच्या बाहेरील देशांचा विचार करता जगाच्या तुलनेत भारतात मलेरियाची संख्या आणि त्यापासून होणार्‍या मृत्यूची संख्या ही 70 टक्के इतकी आहे.
The post भारतातही वाढले मलेरियाचे रुग्ण appeared first on पुढारी.

नवी दिल्ली : देशात अलीकडच्या काळात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया आदी आजारांचा फैलाव वाढला आहे. जगात 2022 मध्ये नोंदवलेल्या 52 लाख मलेरियाच्या रुग्णांपैकी 66 टक्के रुग्ण भारतात आढळल्याची माहिती माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही आकडेवारी दिली आहे. आग्नेय आशियातील कोणत्याही देशासाठी ही संख्या सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली ही 2020 सालची …

The post भारतातही वाढले मलेरियाचे रुग्ण appeared first on पुढारी.

Go to Source