कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १७३ मतदान केंद्रे

बिद्री, पुढारी वृत्तसेवा : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीचे रविवारी (दि. ३) मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत आहे. मतदान प्रक्रियेसाठी राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर या चार तालुक्यातील कार्यक्षेत्रात १७३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणेसाठी सुमारे १५०० … The post कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १७३ मतदान केंद्रे appeared first on पुढारी.
#image_title

कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १७३ मतदान केंद्रे

बिद्री, पुढारी वृत्तसेवा : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीचे रविवारी (दि. ३) मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत आहे. मतदान प्रक्रियेसाठी राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर या चार तालुक्यातील कार्यक्षेत्रात १७३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणेसाठी सुमारे १५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहेत.
बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीचा गेली महिनाभर धुरळा उडाला होता. आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. निवडणूकीतील शेवटचे कांही दिवस तरी प्रचार शिगेला पोहचला होता. कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे आघाड्यांची चांगलीच दमछाक झाली. शुक्रवारी जाहिर प्रचाराची सांगता झाली. यानंतर छुप्या प्रचाराला वेग आला. रविवारी २५ जागेसाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर या चार तालुक्यातील कार्यक्षेत्रात १७३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणेसाठी सुमारे १५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान सुरक्षेतेसाठी २१५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १७३ मतदान केंद्रासाठी १६ झोन तयार करण्यात आले असून त्यासाठी १६ झोनल अधिका-यांची नियुक्ती करणेत आली आहे. मतदान प्रक्रियेच्या सोयीसाठी २४ एस. टी. बस व इतर ५० हून अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारी (ता. २) रमणमळा, कोल्हापूर येथून मतदान साहित्य वाटप करण्यात येणार असून सकाळपासून नियुक्त केलेले कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. निवडणूकीसाठी ५५ हजार ६० मतदार असून १७३ मतदान केंद्रावरील एका मतदान केंद्रावर आठ कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी असे ९ कर्मचारी काम पहाणार आहेत. आवश्यक्तेनुसार वाढीव पोलीस कर्मचारी देणार दिले जाणार आहेत. मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक असून निर्धारित केलेल्या १६ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे.
चौकट : गटवार मतदार संख्या अशी :
* राधानगरी गट क्र. १ (गावे ३६) ९१२० मतदार,
* राधानगरी गट क्र. २ (१४ गावे) ८०९६,
* कागल गट क्र. ३ (१७ गावे) ८०८७,
* कागल गट क्र. ४ (२९ गावे) ७०७५ ,
* भुदरगड गट क्र. ५ (५७ गावे) १२०५५,
* भुदरगड गट क्र. ६ (५८ गावे) ७१९४,
* करवीर गट क्र. ७ (७ गावे) ३४४८
असे एकूण ५५०६५ निवडणूकीसाठी पात्र मतदार आहेत.

मंगळवारी मतमोजणी !
‘बिद्री ‘ निवडणूकीतील मतमोजणी मंगळवारी (दि.५) सकाळी ८ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. ही मतमोजणी सुवर्णभूमी हॉल, मुस्कान लॉन, कोल्हापूर या ठिकाणी होणार येथे असून १०० टेबलावर होणाऱ्या मतमोजणीसाठी ५५० अधिकारी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण काकडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून युसुफ शेख काम पहात आहेत.
हेही वाचलंत का?

Jayant Patil On Ajit Pawar : घरातील गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही: जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला
हिंगोली: हिवरा जाटू येथे पालकमंत्र्यांकडून पिकांची पाहणी, गोजेगाव येथील मृताच्या कुटुंबाला धनादेश सुपूर्त

The post कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १७३ मतदान केंद्रे appeared first on पुढारी.

बिद्री, पुढारी वृत्तसेवा : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीचे रविवारी (दि. ३) मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत आहे. मतदान प्रक्रियेसाठी राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर या चार तालुक्यातील कार्यक्षेत्रात १७३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणेसाठी सुमारे १५०० …

The post कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १७३ मतदान केंद्रे appeared first on पुढारी.

Go to Source