सांगली : ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष दाखवून ३ कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

जत, पुढारी वृत्तसेवा : एका शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून लोकांना दीडपट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून ३ कोटी ४४ हजार ४९५ रूपये रक्कमेची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मालकासह पाच व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर हायटेक ट्रेडर्स कंपनीच्या विरोधात पाच जणाविरोधात सोमनाथ याल्लापा रानगटी यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक करून … The post सांगली : ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष दाखवून ३ कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल appeared first on पुढारी.
#image_title

सांगली : ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष दाखवून ३ कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

जत, पुढारी वृत्तसेवा : एका शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून लोकांना दीडपट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून ३ कोटी ४४ हजार ४९५ रूपये रक्कमेची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मालकासह पाच व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर हायटेक ट्रेडर्स कंपनीच्या विरोधात पाच जणाविरोधात सोमनाथ याल्लापा रानगटी यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक करून कंपनीची चेन साखळी ब्रेक केली आहे. तक्रारी प्राप्त होताच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे.
जत पोलिसात विजयकुमार एम. बिरजगी (व ३९) रा. मॅगोनेस्ट सोसायटी ए २०८ सिंहगड रोड , आनंद बसाप्पा बसरगी (व ४५) रा. डायरी गांव धाराशिव मंदिर जवळ, नेर पुणे, बापुराय रामगोंडा बिरादार (व ४२) रा. भिवरगी फाटा संख ता. जत, शोभा बापुराय बिरादार (व.३४) रा. भिवरगी फाटा संख ता. जत ,अनिता विजयकुमार बिराजदार (व ३२ )रा. मॅगोनेस्ट सोसायटी ए- २०८ सिंहगड रोड पुणे या पाच जणावर फसवणूक व विश्वासघात केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे सदरचा गुन्हा तीन कोटीपेक्षा अधिक रकमेचा असल्याने सांगली येथील गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया रात्री जत पोलिसात उशिरा सुरू होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेअर हायटेक ट्रेडर्स कंपनीचे प्रोप्रायटर विजयकुमार एम. बिरजगी यांनी आमच्या कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त रक्कम परतावा देणेची खात्रीशीर हमी देवुन व आमिष दाखविले त्याचे बोलण्यावर विश्वास ठेऊन जत येथील सोमनाथ याल्लापा रानगटी , प्रदीप पुजारी , महांतेश आडव्याप्पा डोणुर यांनी तीन कोटी 44 लाखाची गुंतवणूक केली. परंतु वेळेत परतावा न मिळाल्याने पोलिसात धाव घेतली आहे. जत येथील सोमनाथ रानगटी या गुंतवणूकदाराने सुरवातीस १,कोटी ८८,लाख२,४९५ रुपये रक्कम शेअर हायटेक ट्रेडर्स या कंपनींचे बँक खात्यावर १० महिन्याचे योजनेमध्ये गुंतवणुक केली, कंपनीचे विजयकुमार एम. बिरजगी यांनी दिले.
हमीप्रमाणे गुंतवणूकदाराना कसलाही परतावा न देता त्यांचा विश्वासघात केला आहे. यांनी मिळुन फिर्यादी यांना वेळोवेळी त्यांनी गुंतवणुक केलेल्या रकमेवर निश्चीत परतावा देण्याचे आश्वासन देवुन फिर्यादी यांची गुंतवणुक रक्कम व त्यावरील परतावा रक्कम त्यांनी वेळोवेळी मागणी करुन देखील रक्कम देण्यास टाळाटाळ केली. गुंतवणूकदार यांच्या लक्षात फसवणूक झाल्याचे आले.तसेच ठेवीदार प्रदिप मुरग्याप्पा पुजारी यांची ३६,लाख ८०हजार रुपये व महांतेश आडव्याप्पा डोणुर यांची ७५,लाख ६२ हजार रूपये रक्कमेस अशी २ ठेवीदार व फिर्यादी सोमनाथ रानगटी या तिघांची मिळुन ३कोटी,४४लाख ४९५ रुपये रकमेची आर्थिक फसवणुक केली आहे केली .

The post सांगली : ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष दाखवून ३ कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

जत, पुढारी वृत्तसेवा : एका शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून लोकांना दीडपट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून ३ कोटी ४४ हजार ४९५ रूपये रक्कमेची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मालकासह पाच व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर हायटेक ट्रेडर्स कंपनीच्या विरोधात पाच जणाविरोधात सोमनाथ याल्लापा रानगटी यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक करून …

The post सांगली : ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे नफ्याचे आमिष दाखवून ३ कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Go to Source