पांझरा नदीपात्राचा झाला कचरा डेपो; धुळेकरांचे आरोग्य धोक्यात

धुळे पुढारी वृत्तसेवा – पांझरा नदीमध्ये पिंपळनेर तसेच साक्री तालुक्यातील नदीलगतच्या गावांमधून सांडपाणी आणि दूषित पाणी सोडले जात आहे. पिंपळनेर गावामध्ये तर नदीपात्राचा कचरा डेपो म्हणून वापर होतो आहे. हाच कचरा आणि दूषित पाणी धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा प्रकल्पात येत असल्याने धुळेकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे. …

पांझरा नदीपात्राचा झाला कचरा डेपो; धुळेकरांचे आरोग्य धोक्यात

धुळे Bharat Live News Media वृत्तसेवा – पांझरा नदीमध्ये पिंपळनेर तसेच साक्री तालुक्यातील नदीलगतच्या गावांमधून सांडपाणी आणि दूषित पाणी सोडले जात आहे. पिंपळनेर गावामध्ये तर नदीपात्राचा कचरा डेपो म्हणून वापर होतो आहे. हाच कचरा आणि दूषित पाणी धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा प्रकल्पात येत असल्याने धुळेकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे. धुळे महानगरपालिका यावर कोणतीही उपाययोजना करताना दिसत नसल्याने त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
धुळ्यात लोकसंग्राम पक्षाच्या कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी तेजस गोटे, विजय वाघ, प्रशांत भदाणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळेकर जनतेच्या आरोग्याबाबत साखरी तालुक्यातील संबंधित गावातील प्रशासन आणि धुळे महानगरपालिका उदासीन असल्याचे स्पष्ट करताना धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडाच्या नवीन स्त्रोतात गोळा होणारे पाणी दुषीत असल्याचे आपल्या पाहणीत आढळून आल्याचे धुळयाचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी म्हटले आहे. आपल्या आरोपाला पुरावे म्हणून त्यांनी अनेक छायाचित्रे दाखविलेली आहेत.

पिंपळनेर ग्रामपालिकेकडे असलेला स्वतःचा कचराडेपो पूर्णतः भरलेला आहे. कचरा साठविण्याची कचरा डेपोची क्षमता कधीच संपुष्टात आलेली आहे. यामुळे पिंपळनेर ग्रामपालिका हद्दीतील सर्व प्रकारचा कचरा सर्रास पांझरा नदी पात्रात टाकला जातो. प्लॅस्टिक, रस्त्यावरील सर्व प्रकारची घाण, गटारातील वाहणारी घाण नदी पात्रात सोडले जाते. वस्तुतः पिंपळनेर, सामोडा, अष्टाणे, साक्री अगदी भदाणे गावा पर्यंत पांझरा काठावरील गावातील गटारांतील सांडपाण्याची स्वतंत्र व्यवस्था लावण्याची कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाही.

शौचालयातील घाण व सांडपाणी सुध्दा पांझरा नदी पात्रात सोडले जाते. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यातून पांझरा पात्रातील वर्षभरात साठलेली घाण तसेच नदीच्या उतारानुसार व प्रवाहा प्रमाणे एका गावातून दुसऱ्या गावातील घाण एकत्र होवून अखेरीस अक्कलपाडा धरणात एकत्रीत जमा होते. अक्कलपाडा धरणात गोळा होणाऱ्या पाणी साठ्यात प्रतिवर्षी एकत्रित गोळा होत आहे. अर्थात ही घाण एकत्र साठून येत्या काही वर्षात अक्कलपाडा धरणाच्या गेट मध्ये अडकून गंभीर प्रश्न निर्माण होईल. पण महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रात जर काही बिघाड झाला तर हेच घाण पाणी आपल्याला पिण्यासाठी नळाव्दारे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेची जलशुध्दीकरण यंत्रणा पुर्ण क्षमतेने कार्यरत असतांना सुध्दा नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो पाणी बंद पडल्यानंतर काय होईल, हे कल्पनेच्या पलिकडे आहे, असे देखील गोटे यांनी सांगितले आहे.
महापालिका व पाटबंधारे विभागाने आपल्या आरोग्याच्या प्रश्नाची कशा पध्दतीने वाट लावली याची एकदा पिंपळनेर ते अक्कलपाडा धरणातील पाण्याच्या साठ्यापर्यंत पांझरा नदी पात्राच्या एका बाजूने भेट देवून जरुर पाहणी करावी,असे आवाहन देखील गोटे यांनी केले आहे.
महापालिकेची जलशुध्दीकरण यंत्रणा आधीच आंधळ्या बहिऱ्यांची जत्रा आहे. बाभळे व पांझरा जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वित असतांना धुळेकर नागरिकांना अनेकदा गढूळ व घाण वास मारणारे पाणी प्यावे लागते. अनेक वेळा नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे अशा बहुमोल सुचना पालिका प्रशासन करीत असते. तब्बल तिनशे नऊ कोटी रुपये खर्ची टाकून धुळेकरांच्या नळाला आठवडा ते दहा दिवस नळाला पाणी येत नाही.
मागील पाच वर्षांच्या कालखंडात भाजपाचा धुळे महापालिकेवर एकछत्री अंमल होता, मागील पाच वर्षात शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, भुमिगत गटार योजना, शहरातील गल्ली बोळासकट सर्व रस्ते, सर्व डी. पी. रोड, कचरा व्यवस्थापन हे सर्व प्रश्न निकाली काढता आले असते .पण पालिकेची सत्ता आली म्हणजे काय काम करावे लागते. याचा विचार आणि प्राधान्य यापेक्षा मला काय लूटता येईल ? याचेच गणित मांडले. शहराच्या विकासासाठी पिण्याचा पाण्याचा, भूमीगत गटार योजनेचा, कचरा संकलनाचा, कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पास प्राधान्य देणे आवश्यक होते धुळेकरांच्या या दुर्देवास अन्यकुणी जबाबदार नाही. स्वतः मतदारच जबाबदार आहेत. सहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या या शहरात पालिकेचे एक चांगले उद्यान असून नये यापेक्षा कुठले मोठे दुर्देव असावे ? असेही अनिल गोटे यांनी म्हटले आहे.