रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लागणार : गिरीश महाजन
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – जिल्ह्यातील रेल्वेबाबत असलेल्या प्रश्नांवर भुसावळ डी आर एम यांच्या कार्यालयात शनिवार (दि.२२) रोजी जिल्ह्यातील नामदार व आमदार यांच्या उपस्थितीत चर्चा पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न येत्या दोन-तीन महिन्यात मार्गी लागणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात नामदार गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, आमदार राजू मामा घोडे, आमदार चंद्रकांत पाटील, मनोज बियाणे यांच्या उपस्थितीमध्ये शनिवार (दि.२२) रोजी सुमारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये जिल्ह्यातील रेल्वे संबंधित सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. पाचोरा, जामनेर ब्रॉडगेज असो की बोदवड पुला खाली पाणी, सावदा ते शेड इतर प्रश्नांवर चर्चा झाली. भुसावळ रेल्वे स्थानकाला लागून बस स्थानक असून बस स्थानकाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. सध्या बस स्थानक असलेल्या बस स्थानकाच्या समोर असलेली रेल्वेची जागा अदलाबदल करायची आहे. बरेच दिवसांपासून भुसावळकर हालअपेष्टा सहन करीत आहेत. मात्र या ठिकाणी फक्त बस स्थानक नाही तर बसपोर्ट करायचे असून एका महिन्याच्या आत या जागेचा वाद सोडविला जाईल व जागा एक्स्चेंज करण्यात येईल असे वक्तव्य नामदार गिरीश महाजन यांनी Bharat Live News Media प्रतिनिधीशी बोलताना केले.
हेही वाचा:
आमदार मंगेश चव्हाण यांना पोलीस स्टेशन समोर पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी
13 वर्षांपूर्वी त्सुनामीत गेलेल्या पत्नीचा मृतदेह ‘तो’ आजही शोधतोय