‘माझे कपडे उतरवले, आणि मग…’; प्रज्वलच्या भावाला अटक

‘माझे कपडे उतरवले, आणि मग…’; प्रज्वलच्या भावाला अटक


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जेडीएसचे विधान परिषद आमदार (JD(S) MLC) आणि कर्नाटकचे माजी मंत्री एच. डी. रेवन्ना यांचे पुत्र सूरज रेवन्ना यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. हसन पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा हसन येथे त्यांची लैंगिक शोषणाच्या प्रकरणाबाबत चौकशी केली आणि त्यानंतर सूरज रेवन्ना यांना अटक करण्यात आली, अशी माहिती हसनचे पोलीस अधीक्षक मोहम्मद सुजिथा यांनी दिली. सूरज रेवन्ना हा माजी खासदार प्रज्वल रेवन्नाचा छोटा भाऊ आहे.
१६ जून रोजी होलेनारसीपुरा येथील गन्निकडा फार्ममध्ये पक्षाच्या एका पुरुष कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा सूरज रेवन्ना याच्यावर आरोप आहे. नोकरीसाठी भेटायला गेलेल्या तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पीडिताने तक्रारीत म्हटले आहे की तो जेडीएस पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता होता. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तो सूरज यांना कोलंगी गावात भेटला होता.
‘अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले’
“आम्ही दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले. नंतर त्यांनी मला १६ जून रोजी गन्निकडा येथील त्याच्या फार्म हाऊसवर भेटायला बोलवले. मी प्रवेशद्वारावर पोलिसांना भेटलो. मी सुरज यांच्या भेटीचा मेसेज दाखवल्यावर मला आत जाऊ दिले. मी सूरज यांच्या खोलीत प्रवेश करताच त्यांनी मला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि माझ्या ओठांचे चुंबन घेतले. जर मी त्याच्यासोबत राहिलो तर मला राजकीय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर माझा आक्षेप न जुमानता त्यांनी माझे कपडे उतरवले आणि माझ्याशी अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. त्यांनी मला धमकीही दिली. जेव्हा मी शिवकुमार यांना याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी मला नोकरी आणि पैसे देण्याचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला,” असे पीडित कार्यकर्त्याने म्हटले आहे.
प्रदीर्घ चौकशीनंतर सूरज यांना अटक
सुरज रेवन्ना यांच्याविरुद्ध होलेनारसीपुरा ग्रामीण पोलिस स्थानकात आयपीसीच्या ३७७, ३४२, ५०६ नुसार एफआयआर दाखल करण्यात आले. हसन पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ चौकशीनंतर सूरज यांना अटक करण्यात आली.
पीडित पुरुषाला वैद्यकीय तपासणीसाठी बंगळूरला नेले
एच. डी. रेवन्ना यांचा दुसरा मुलगा प्रज्वल याला सीआयडीच्या एसआयटीने यापूर्वी सेक्स स्कँडल प्रकरणी अटक केली होती. दरम्यान, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी बंगळूरला नेण्यात आले आहे.
हे ही वाचा :
 

Go to Source