आमदारच्या पुतण्याचा कारनामा…! विरुद्ध दिशेने गाडी चालवून एकाला जागीच चिरडले
मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुण्यात पोर्शे अपघातनंतर आंबेगाव तालुक्यातून पुन्हा एका कारने दुचाकेला उडवल्याची घटना समोर आली आहे. एका कार चालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कार चालक हा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे.
ओम सुनिल भालेराव असे अपघतात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत मंचर पोलिसात नितीन रामचंद्र भालेराव यांनी फिर्याद दिली आहे. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावाजवळ ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे. मयूर साहेबराव मोहिते असे चारचाकी चालकाचे नाव आहे. तो खेड तालुक्यातील मोहितेवाडी, शेल पिंपळगाव येथे राहणारा आहे. याच्या विरुद्ध मंचर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – नाशिक माहमार्गांवर असणाऱ्या एकालहरे गावाजवळ ओम भालेराव हा मंचरहुन कळंब च्या दिशेने त्याची गाडी क्रमांक एम.एच. ०४ ४४२९ ही येत होता. त्यावेळी कळंबच्या दिशेने मंचरकडे येणारी फॉरच्यूनर गाडी नं. एम.एच.१४ के. जे. ७५५७ ही वरील चालकाने भरधाव वेगाने रोडच्या विरूध्द बाजुने चालवुन मोटार सायकलला जोरात ठोस धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ओम भालेराव याच्या डोक्याला मार लागला. त्याला प्राथमीक उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय मंचर येथे पाठवण्यात आले होते. मात्र याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. नितीन भालेराव यांनी मंचर पोलिसात मयूर मोहिते विरोधात तक्रार दाखल केली आहे. मयत ओम भालेराव च्या पाठीमागे आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी अधिक तपास मंचर पोलीस करत आहेत.
हेही वाचा
पहिली लग्नपत्रिका सलमान खानला; सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबालचे आज लग्न
नागपूर : वृद्ध दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपवले
नाशिक : पुणे-इंदूर महामार्गावर नागरिकांचा रास्ता रोको; १७ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू