भारताचा टेनिस स्टार सुमित नागल पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics 2024 : भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागल अगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्याने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची माहिती दिली. तो टेनिसच्या पुरुष एकेरी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार असून दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. याआधी तो टोकियो 2020 मध्येही खेळला होता, जिथे त्याला दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे …

भारताचा टेनिस स्टार सुमित नागल पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Paris Olympics 2024 : भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागल अगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्याने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची माहिती दिली. तो टेनिसच्या पुरुष एकेरी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार असून दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. याआधी तो टोकियो 2020 मध्येही खेळला होता, जिथे त्याला दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
नागलने एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, ‘मी अधिकृतपणे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र झालो आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. माझ्यासाठी हा एक संस्मरणीय क्षण आहे. माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणे. मला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल TOPS आणि SAI चे खूप खूप आभार’, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. (Paris Olympics 2024)
ऑलिम्पिक 2024 फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त पदके जिंकण्याकडे भारताचे लक्ष आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय टेनिस स्टार सुमित नागल याने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरीसाठी अधिकृतपणे पात्र ठरल्याचे त्याने जाहीर केले आहे.

Extremely glad to share that I have officially qualified for the 2024 Paris Olympics. This is a monumental moment for me as the Olympics holds a special place in my heart!
One of my career highlights so far was participating in the 2020 Tokyo Olympics (1/n) pic.twitter.com/XZMquSss0x
— Sumit Nagal (@nagalsumit) June 22, 2024

ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) ने सांगितले की 10 जून रोजी आयटीएफनुसार पात्रतेसाठी खेळाडूंच्या क्रमवारीचा विचार केला गेला तेव्हा नागल पर्यायी खेळाडूंच्या यादीत होता. रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरी स्पर्धेत भाग घेणार आहेत. टॉप-10 खेळाडू असल्याने बोपण्णाकडे जोडीदार निवडण्याचा पर्याय होता. त्यामुळे एआयटीएने बालाजीच्या निवडीला मान्यता दिली.
नागलने या महिन्याच्या सुरुवातीला हेलब्रॉन चॅलेंजर जिंकून पात्रतेच्या संधी निर्माण केल्या होत्या. ज्यामुळे तो एटीपी एकेरी क्रमवारीत अव्वल 80 मध्ये गेला होता. हेलब्रॉन जिंकणे हे नागलचे या मोसमातील दुसरे चॅलेंजर विजेतेपद ठरले होते. त्यापूर्वी त्याने वर्षाच्या सुरुवातीला चेन्नई चॅलेंजर जिंकले होते.
नागलसाठी 2024 चा हंगाम चांगला राहिला आहे. त्याने चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले आणि पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत 37व्या स्थानावर असलेल्या अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. इंडियन वेल्स मास्टर्स आणि मॉन्टे कार्लो मास्टर्स सारख्या एटीपी 1000 स्पर्धांच्या मुख्य ड्रॉसाठीही तो पात्र ठरला होता.