जेजुरीच्या ऐतिहासिक होळकर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू
जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या जेजुरीच्या खंडोबानगरीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने जेजुरी तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 359 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील 109 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. यामध्ये जेजुरी गड, खंडोबा मंदिर, लवथवेश्वर मंदिर, होळकर तलाव, पेशवे तलावाची डागडुजी या कामांचा समावेश आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ऐतिहासिक काळात भाविकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी जेजुरी गडाच्या पायथ्याशी 18 एकर जागेत होळकर तलाव आणि भाविकांना कुलधर्म-कुलाचारानुसार धार्मिक विधी करण्यासाठी चिंचेच्या बागेची निर्मिती केली होती. गेली अनेक पिढ्या लाखो भाविक होळकर तलाव आणि चिंचेच्या बागेचा वापर करीत आहेत. तसेच 1935 ते 1976 या कालावधीत होळकर तलावाचे पाणी जेजुरीनगरीला पिण्यासाठी उपलब्ध होत होते.
त्यानंतर होळकर तलाव दुर्लक्षित झाला. तलावाच्या भिंतीतील दगड निसटले होते, अनेक ठिकाणी भिंतीत झाडे उगवून भिंतीला तडे गेले होते. या तलावाचे सुशोभीकरण व्हावे यासाठी दैनिक ‘पुढारी’ने वारंवार आवाज उठवला होता. 250 वर्षांनंतर शासनाने होळकर तलाव व पेशवे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. होळकर तलावाच्या तटबंदीच्या भेगा बुजविणे, पडझड झालेल्या दगडी बसविणे, भिंतीत उगवलेली झाडे काढणे, तलावाभोवती रेलिंग करणे आदी कामांचा यात सहभाग आहे. या दोन्ही तलावांचे सुशोभीकरण झाल्यानंतर परिसरात पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे.
हेही वाचा :
क्रूर बाप ! जेवणात चिकन नसल्याने पोटच्या मुलीच्या डोक्यात घातली वीट
नोव्हेंबरअखेर पुणे जिल्ह्यात 47 टक्केच पेरण्या पूर्ण
The post जेजुरीच्या ऐतिहासिक होळकर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू appeared first on पुढारी.
जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या जेजुरीच्या खंडोबानगरीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने जेजुरी तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 359 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील 109 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. यामध्ये जेजुरी गड, खंडोबा मंदिर, लवथवेश्वर मंदिर, होळकर तलाव, पेशवे तलावाची डागडुजी या कामांचा समावेश आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ऐतिहासिक काळात भाविकांना सुविधा …
The post जेजुरीच्या ऐतिहासिक होळकर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू appeared first on पुढारी.