केएस भरत द. आफ्रिका दौऱ्यात कर्णधार! भारत ‘अ’ संघाचे करणार नेतृत्व

पुढारी ऑनलाईन डेस्क : KS Bharat Captain : आंध्रचा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरत हा दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या चार दिवसीय दोन सराव सामन्यांमध्ये भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने या सामन्यांसाठी दोन वेगवेगळे संघ जाहीर केले आहेत. भरत, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, ध्रुव जुरेल, मानव सुतार आणि वी कावेरप्पा हे सहा खेळाडू दोन्ही सामन्यांचा … The post केएस भरत द. आफ्रिका दौऱ्यात कर्णधार! भारत ‘अ’ संघाचे करणार नेतृत्व appeared first on पुढारी.
#image_title

केएस भरत द. आफ्रिका दौऱ्यात कर्णधार! भारत ‘अ’ संघाचे करणार नेतृत्व

पुढारी ऑनलाईन डेस्क : KS Bharat Captain : आंध्रचा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरत हा दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या चार दिवसीय दोन सराव सामन्यांमध्ये भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने या सामन्यांसाठी दोन वेगवेगळे संघ जाहीर केले आहेत. भरत, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, ध्रुव जुरेल, मानव सुतार आणि वी कावेरप्पा हे सहा खेळाडू दोन्ही सामन्यांचा भाग असतील, असे निवड समितीने स्पष्ट केले आहे.

Team India South Africa Tour : टीम इंडियाची घोषणा, द. आफ्रिका दौर्‍यातील तीन मालिकांसाठी तीन कर्णधार

भारत-अ संघाला द. आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या चार दिवसीय दोन सराव सामने खेळायचे आहेत. बीसीसीआयने शुक्रवारी या दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघाचीही घोषणा केली. भारत ‘अ’ संघात काही खेळाडूंचाही समावेश आहे ज्यांना यजमान द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे, टी20 किंवा कसोटी संघातही स्थान मिळाले आहे.
केएस भरतने (KS Bharat Captain) भारताकडून पाच कसोटी सामने खेळले आहेत. त्याने जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला होता. देवदत्त पडिकलचाही पहिल्या 4 दिवसीय सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. सेंच्युरियनमध्ये बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी हा सामना रंगेल. अभिमन्यू इश्वरन तंदुरुस्त असेल तरच तो संघात असेल. सरफराज खान, प्रसिद्ध कृष्णा आणि तुषार देशपांडे हे 11 ते 14 डिसेंबर दरम्यान पहिला सामना खेळणार आहेत. दुसरा सामना 26 ते 29 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल ज्यामध्ये तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि नवदीप सैनी यांना संधी मिळेल.
द. आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. या दौऱ्यात भारताला तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताचा नियमीत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख फलंदाज विराट कोहली यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून ते कसोटी संघात खेळणार आहेत. गुरुवारी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाला अंतिम रूप दिले. या दौर्‍यासाठी तीन मालिकेत तीन वेगवेगळे संघ आणि कर्णधार निवडण्यात आले असून कसोटीसाठी रोहित शर्मा, एकदिवसीय मालिकेसाठी के.एल. राहुल तर पहिल्या 3 टी-20 सामन्यासाठी सूर्यकुमार यादव कर्णधार असेल.पाचपैकी शेवटच्या 2 टी-20 सामन्यासाठी नंतर संघ निवडण्यात येईल.
पहिल्या 4 दिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ
केएस भरत (कर्णधार), साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पड्डिकल, प्रदोष रंजन पॉल, सरफराज खान, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकुर, पुलकित नारंग, सौरभ कुमार, मानव सुतार, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, वी कावेरप्पा आणि तुषार देशपांडे.
दुसऱ्या 4 दिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ
केएस भरत (कर्णधार), साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, मानव सुतार, आकाश दीप, वी कावेरप्पा आणि नवदीप सैनी. (KS Bharat Captain)

More details on the India A squads and India inter-squad three-day match here 👇👇https://t.co/ALyZwjQdVA #SAvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2023

The post केएस भरत द. आफ्रिका दौऱ्यात कर्णधार! भारत ‘अ’ संघाचे करणार नेतृत्व appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : KS Bharat Captain : आंध्रचा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरत हा दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या चार दिवसीय दोन सराव सामन्यांमध्ये भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने या सामन्यांसाठी दोन वेगवेगळे संघ जाहीर केले आहेत. भरत, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, ध्रुव जुरेल, मानव सुतार आणि वी कावेरप्पा हे सहा खेळाडू दोन्ही सामन्यांचा …

The post केएस भरत द. आफ्रिका दौऱ्यात कर्णधार! भारत ‘अ’ संघाचे करणार नेतृत्व appeared first on पुढारी.

Go to Source