चंद्रपुरात जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; तिघांना अटक

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : तीन महिन्यांपूर्वी तिहेरी हत्याकांडाने हादरलेले नागभिड तालुक्यातील मौशी गाव पुन्हा जादूटोणा केल्याच्या संशयातून एका वृद्धाची हत्या करण्यात आल्याने हादरले आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी (दि.२१) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात नागभिड पोलिसांनी तिघांना अटक केली असून आसाराम दोनाडकर (67) असे मृत्त वृद्धाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम दोनाडकर …

चंद्रपुरात जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; तिघांना अटक

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : तीन महिन्यांपूर्वी तिहेरी हत्याकांडाने हादरलेले नागभिड तालुक्यातील मौशी गाव पुन्हा जादूटोणा केल्याच्या संशयातून एका वृद्धाची हत्या करण्यात आल्याने हादरले आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी (दि.२१) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात नागभिड पोलिसांनी तिघांना अटक केली असून आसाराम दोनाडकर (67) असे मृत्त वृद्धाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम दोनाडकर (वय ६७) हे नागभिड तालुक्यातील मौशी गावातील रहिवासी आहेत. ते जादूटोणा करत असल्याचा संशय घेतला जात होता. दोनाडकर यांच्या घरी गुरूवारी रात्री आठच्या सुमारास काही लोकांचा जमाव गेला. जादूटोणा करतो, म्हणून वाद घातला आणि  आसाराम दोनाडकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. बेदम मारहाण झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच
नागभिड पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट घटनास्थळी जावून चौकशी केली. या प्रकरणी  तिघांना अटक करण्यात आली असून संतोष जयघोष मैंद (वय २६),  श्रीकांत जयघोष मैंद (वय २४), रुपेश देशमुख (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या करण्यात आल्याने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. याच मौशी गावात तीन महिन्यांपूर्वी वडिलाने आपल्या दोन मुली व पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली होती.