बलात्काराची धमकी देत महिलेवर हल्ला, 6 जणांवर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-एका टोळक्याने महिलेस बलात्कार करण्याची धमकी देत प्राणघातक हल्ला केल्याची घटना पंचवटी मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने पंचवटी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. फुले नगर येथील भराडवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेच्या फिर्यादीनुसार, ५ डिसेंबर २०२३ रात्री आठ वाजता हल्ला …

बलात्काराची धमकी देत महिलेवर हल्ला, 6 जणांवर गुन्हा

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा-एका टोळक्याने महिलेस बलात्कार करण्याची धमकी देत प्राणघातक हल्ला केल्याची घटना पंचवटी मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने पंचवटी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
फुले नगर येथील भराडवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेच्या फिर्यादीनुसार, ५ डिसेंबर २०२३ रात्री आठ वाजता हल्ला केला होता. संशयित संदीप अशोक लाड, धरम भास्कर शिंदे, रमेश पांडुरंग बोडके, सुरज उर्फ सुऱ्या रमेश बोडके, विनोद बोडके, धिरज बोडके यांनी हल्ला केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. महिला घरी जात असताना संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला. तसेच आमच्याविरोधात जबाब दिला तर आम्ही तुझा बलात्कार करू व जीवे मारू अशी धमकी दिली. त्यामुळे भितीपोटी महिला तेथून पळाली असता संशयित संदीपने कोयत्याने वार केले. तर इतरांनी महिलेस मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी महिलेने न्यायालयात दाद मागितली. त्यानुसार न्यायालयाने संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
हेही वाचा –

तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज; मुख्यमंत्र्याची उपस्थिती
बीड : भोपला तलावात पोहायाला गेलेला युवक बुडाला; शोधकार्य सुरु