सिल्ली येथे कालव्यामध्ये ट्रॅक्टर कोसळ्याने चालकाचा जागीच मृत्यू

सिल्ली येथे कालव्यामध्ये ट्रॅक्टर कोसळ्याने चालकाचा जागीच मृत्यू

भंडारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : सिल्ली येथे शेतशिवारानजीकच्या कालव्याजवळ बुधवारी (दि.19) दुपारी अपघाताची घटना घडली. या अपघातात धान्य भरण्यासाठी कालव्याजवळून जात असताना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला. यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. कैलाश देवमन बावनकुळे (वय.34, रा. सिल्ली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सिल्ली येथील शेतकरी कैलाश बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी शेतीकामासाठी नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता. सध्या धान्य भरण्याचे काम सुरु असून बुधवारी दुपारच्या वेळेस शेतातील धान्य येत असताना त्यांचे ट्रॅक्टरवरचे नियंत्रण सुटले. या दरम्यान बावनकुळे उपसा सिंचन योजनेच्या कालव्याजवळून जात असतांना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला. त्यामध्ये ट्रॅक्टरखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यासोबतच कारधाचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत साखरे, तोमेश्वर लांबकाने, जितेंद्र काटगाये, अभिषेक मिश्रा, यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनाकरीता रुग्णालयात पाठवून दिला.
हेही वाचा :

बीड: केज येथे लग्नाच्या आमिषाने विवाहित परिचारिकेवर अत्याचार
Nashik Crime | बलात्काराची धमकी देत महिलेवर हल्ला, 6 जणांवर गुन्हा
फुकट्या प्रवाशांनो सावधान; मध्य रेल्वे करणार कडक कारवाई