महाडच्या डॉ. प्रसन्न बुटाला यांचा दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेत झेंडा
श्रीकृष्ण द .बाळ
महाड: प्रतिवर्षी दक्षिण आफ्रिकेत डरबन ते पीटर मेरीजबर्ग या शहरादरम्यान होणाऱ्या अपहील मॅरेथॉन म्हणून परिचित असलेल्या” कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन ” स्पर्धेत महाडच्या ५२ वर्षीय डॉ. प्रसन्न बुटाला यांनी बाजी मारली. त्यांनी ही स्पर्धा ११ तास २२ मिनिटांत पूर्ण करून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविला. या स्पर्धेमध्ये जवळपास ९० किलोमीटर अंतराचे घाट माथ्यावरील चढ वळणे पार करावे लागतात. त्यामुळे जगभरातील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा एक आव्हान असते.
५० किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन ५ तास ४९ मिनिटांत पूर्ण होणे गरजेचे
फुल मॅरेथॉन ४ तास ४९ मिनिटांत किंवा ५० किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन ५ तास ४९ मिनिटांत पूर्ण होणे गरजेचे असते. एकदा का तुम्ही यामध्ये पात्र झाला की दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला कसून सराव करणे व कमीत कमी ६ महिने ते वर्षभरापर्यंत तयारी करायला वेळ द्यावा लागतो. कॉम्प्रेस मॅरेथॉन ही बारा तासाच्या आत पूर्ण करायला लागते. त्यासाठी तिला वेगवेगळ्या किलोमीटरसाठी वेगवेगळे कट ऑफ दिले जातात. या कटऑफ चे अंतर तुम्ही पार केले नाहीत. तर डीएनएफ केले जाते, असे प्रसन्न बुटाला यांनी सांगितले.
डॉ. जितेंद्र खाजगीवाले यांनी कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन
महाडचे सुप्रसिद्ध दंत शल्य विशारद डॉ. जितेंद्र खाजगीवाले यांनी कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याबाबत आपल्याला प्रोत्साहन दिले. ही स्पर्धा आव्हान म्हणून आपण स्वीकारली. कॉम्प्रेस रजिस्ट्रेशन ७ एप्रिल २०२४ रोजी झाल्यानंतर फक्त दोन महिन्याचा कालावधी मला मिळाला होता. या दोन महिन्यांमध्ये मी कसून सराव केला. एकच ध्येय ठेवून कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करण्याचा निर्धार केला. आणि एकाग्रता व कुटुंब, मित्रांचा मिळालेला पाठिंबा या सर्व गोष्टींमुळे मी ही मॅरेथॉन पूर्ण करू शकलो, असे त्यांनी ‘दै. Bharat Live News Media’शी बोलताना सांगितले.
महाड शहरातील चवदार तळे येथे राहणाऱ्या उल्हास बुटाला यांचे प्रसन्न बुटाला हे कनिष्ठ चिरंजीव आहेत. विविध सामाजिक संस्था तसेच वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
हेही वाचा
तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज; मुख्यमंत्र्याची उपस्थिती
रायगड: वरंधा घाटात रस्ता खचला; वाहतूक धोकादायक
रायगड: महाडमध्ये ३० जवानांचे एनडीआरएफ पथक दाखल