धुळे जिल्ह्यात कृषि संजीवनी पंधरवड्याचे आयोजन

धुळे पुढारी वृत्तसेवा- डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने जिल्ह्यात 17 जून ते 1 जुलै या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येतो आहे. या पंधरवड्यामध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ट मुद्यांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या पंधरवाडयामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी …

धुळे जिल्ह्यात कृषि संजीवनी पंधरवड्याचे आयोजन

धुळे Bharat Live News Media वृत्तसेवा- डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने जिल्ह्यात 17 जून ते 1 जुलै या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येतो आहे. या पंधरवड्यामध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ट मुद्यांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या पंधरवाडयामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले आहे.

या पंधरवडयाची सांगता दिनांक 1 जुलै, 2024 रोजी होईल.
स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषि दिन साजरा करण्यात येणार आहे.
या पंधरवाड्यामध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ठ मुद्यांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे हा या कृषि संजीवनी पंधरवाडा कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सर्व गावांत उपक्रम
धुळे जिल्हृयात सर्व गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्याची सुरुवात 17 जून 2024 पासून झाली असून जिल्ह्यातील एकूण 137 गावांमध्ये 3 हजार 257 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बीजप्रक्रिया प्रात्याक्षिक जनजागृती मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध पिकांवर करावयाच्या बीजप्रक्रिया आणि त्याचे फायदे याविषयी माहिती देण्यात आली. बीजप्रक्रीयेचे महत्व जमिनीतून तसेच बियाणेद्वारे पसरणारे बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगाचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
18 जून  रोजी 143 गावांमध्ये 2 हजार 532 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री किसान उत्सव दिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे दि. 19 जुन ते 1 जुलै, 2024 या कालावधीत प्रत्येक दिवशी खालीलप्रमाणे महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
असा आहे कृषि पंधरवडा
19 जून  रोजी जमिन सुपिकता जागृती दिन साजरा झाला. 20 जून 2024 रोजी गुणवत्तापुर्ण निविष्ठांची ओळख दिन. 21 जून 2024 रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार. 22 जून 2024 रोजी पिक विमा जनजागृती दिन. 23 जून 2024 रोजी हवामान अनुकुल शेती तंत्रज्ञान प्रसार दिन. 24 जून 2024 सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान दिन. 25 जून 2024 कापुस, भात व ऊस लागवड तंत्रज्ञान दिन. 26 जून 2024 रोजी तुर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान दिन. 27 जून 2024 रोजी कृषि महिला शेतकरी सन्मान दिन. 28 जून 2024 रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना. 29 जून 2024 शेतकरी मासिक वाचन दिन व वर्गणीदार वाढविणे. 30 जून 2024 रोजी प्रगतीशील शेतकरी संवाद दिन तर 1 जुलै 2024 रोजी कृषि दिन साजरा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या पंधरवाडयामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले आहे.
हेही वाचा –

महायुती सरकारविरोधात शुक्रवारी काँग्रेसचे ‘चिखल फेको’ आंदोलन
गॉर्जियस…, अॅनिमल फेम तृप्ती डिमरी ब्लॅक बिकिनीत समुद्रकिनारी