कोल्हापूर: टोप येथे चहाचे दुकान पेटविण्याचा प्रयत्न

कोल्हापूर: टोप येथे चहाचे दुकान पेटविण्याचा प्रयत्न

टोप/ कासारवाडी : Bharat Live News Media वृत्तसेवा: टोप कासारवाडी फाट्यावर असणाऱ्या रायबा चहा व समर्थ सॅन्क पॉईंट या दुकानाला अज्ञाताने आग लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे – बेंगळरू  राष्ट्रीय महामार्गालगत टोपजवळ मटन मार्केटजवळ नारायण भोंगार्डे यांच्या मालकीचे रायबा चहा व समर्थ सॅन्क पॉईंट अशी दुकाने आहेत. रविवारी सायंकाळी नेहमी प्रमाणे ते दुकान बंद करून गेले होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहे.
हेही वाचा 

कोल्हापूर : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर निवड व मार्गदर्शन

कोल्हापूर: पावसामुळे टोप, कासारवाडी रस्त्यावर पाणी, चालकांची कसरत

कोल्हापूर : संदीप लोखंडे मृत्यूप्रकरणी हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल