आळवाई येथे वीज पडुन अंगावर चिमुकल्याचा जागीच मृत्यू
देवणी, Bharat Live News Media वृत्तसेवा : आळवाई (ता. भालकी) येथे रविवारी (दि.16) सांयकाळी वीज अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. रुद्रप्रताप पांडूरंग कोटमाळे (वय.8) असे मृताचे नाव आहे.
रविवारी सायंकाळी सहा वाजता रूद्रप्रताप त्यांच्या कुटूंबातील वडील, आजी, आजोबा हे सर्व शेतामध्ये गेले होते. त्या वेळेस वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची सुरूवात झाली. दरम्यान शेतात असलेल्या रूद्रप्रतापच्या अंगावर पडली आणि तो खाली कोसळला. विजेचा झटका जोरात बसल्याने रुद्रप्रतापचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
नागपूर : रिक्षा-ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात दोन जवानांचा मृत्यू,सहा जखमी
भंडारा : वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू
कुणी जिंकले, कुणी हरले: ईव्हीएम मात्र अद्यापही कर्तव्यावरच !