संसद भवन संकुलातून महापुरुषांचे पुतळे हटवल्याने काँग्रेस संतप्त

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या आवारातील महापुरुषांचे पुतळे हलवण्याचा निर्णय सत्ताधारी यंत्रणेने ‘एकतर्फी’ घेतला होता. यामध्ये महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यांचा समावेश होता. हे पुतळे येथून हलवणे हाच सत्ताधारी गटाचा एकमेव उद्देश होता, असा आरोप काँग्रेसने रविवारी (दि.16) केला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी ‘प्रेरणा स्थळ’ चे उद्घाटन …

संसद भवन संकुलातून महापुरुषांचे पुतळे हटवल्याने काँग्रेस संतप्त

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : संसदेच्या आवारातील महापुरुषांचे पुतळे हलवण्याचा निर्णय सत्ताधारी यंत्रणेने ‘एकतर्फी’ घेतला होता. यामध्ये महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यांचा समावेश होता. हे पुतळे येथून हलवणे हाच सत्ताधारी गटाचा एकमेव उद्देश होता, असा आरोप काँग्रेसने रविवारी (दि.16) केला.
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी ‘प्रेरणा स्थळ’ चे उद्घाटन केले. त्याआधी विरोधी पक्षाने हा हल्ला केला. ज्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक आणि इतर नेत्यांचे सर्व पुतळे असतील, जे यापूर्वी संसदेच्या संकुलात विविध ठिकाणी ठेवण्यात आले होते. काँग्रेसने पुतळे त्यांच्या सध्याच्या ठिकाणाहून हटवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे, तर लोकसभा सचिवालयाने म्हटले आहे की, ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्याने अभ्यागतांना ते व्यवस्थित पाहणे कठीण झाले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, पोर्ट्रेट आणि पुतळ्यांवरील संसदेच्या समितीची शेवटची बैठक 18 डिसेंबर 2018 रोजी झाली होती. यानंतर 17व्या लोकसभा कार्यकाळात त्याची पुनर्रचनाही झाली नव्हती. संवैधानिक उपसभापती या पदाशिवाय हा पहिलाच बार कार्यरत होता. पुढे ते म्हणाले, “आज संसदेच्या संकुलातील पुतळ्यांच्या पुनर्रचनाचे उद्घाटन होत आहे. हा स्पष्टपणे सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी घेतलेला निर्णय आहे, महात्मा गांधींचा पुतळा एकदा नव्हे तर दोनदा हटवण्यात आला आहे,” असे रमेश यांनी सोशल मिडीया एक्सवर एका पोस्ट करत म्हटले आहे.

According to the Lok Sabha website, Parliament’s Committee on Portraits and Statues last met on December 18th, 2018. It was not even reconstituted during the 17th Lok Sabha (2019-2024) which also functioned for the first time without the Constitutional post of Deputy Speaker.…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 16, 2024

रमेश म्हणाले की, आंबेडकर जयंती साजरी करण्याला संसदेच्या संकुलात तितकेच महत्त्व आणि प्रेरणास्थळावर महत्त्व असणार नाही. कारण, त्यांचा पुतळा आता महत्त्वाच्या ठिकाणी नाही. संसद भवन संकुलातील मान्यवर आणि इतर अभ्यागतांना या मूर्ती एकाच ठिकाणी सहज पाहता याव्यात, त्यांना आदरांजली वाहावी यासाठी ‘प्रेरणा स्थळ’ तयार करण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने म्हटले आहे.
हेही वाचा :

नवी दिल्ली : भाजप राष्ट्रीय अध्यक्षपद निवड, कोणाची लागणार वर्णी?
नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात ‘सीएए’ कायदा अडचण ठरणार
शेअर बाजार सोमवारी राहणार बंद, बकरी ईद निमित्त सुट्टी

Go to Source