स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, हायकोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्क: स्वाती मालीवाल प्राणघातक हल्ला प्रकरणातील  आरोपी बिभव कुमार यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्‍ली पाेलिसांना नोटीस जारी केली आहे. बिभव कुमार हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सहाय्‍यक आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्‍यसभा खासदार स्वाती मालीवाल हल्ला प्रकरणात बिभव कुमार यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली …

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, हायकोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: स्वाती मालीवाल प्राणघातक हल्ला प्रकरणातील  आरोपी बिभव कुमार यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्‍ली पाेलिसांना नोटीस जारी केली आहे. बिभव कुमार हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सहाय्‍यक आहेत.
आम आदमी पक्षाच्या राज्‍यसभा खासदार स्वाती मालीवाल हल्ला प्रकरणात बिभव कुमार यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितले आहे. त्यांचे दोन जामीन अर्ज ट्रायल कोर्टाने फेटाळून लावले आहेत.
न्यायमूर्ती अमित शर्मा यांचा समावेश असलेल्या सुट्टीतील खंडपीठाने कुमारच्या जामीन याचिकेवर दिल्‍ली पाेलिसांना नोटीस बजावली.  दिल्ली पोलिसांना तपासाची स्थिती दाखवण्यास सांगितले आहे. ज्येष्ठ वकील एन. हरिहरन यांनी बिभव कुमार यांची बाजू मांडली. तर दिल्ली पोलिसांतर्फे ज्येष्ठ वकील संजय जैन सुनावणीला हजर होते.

Delhi High Court seeks Delhi Police reply on a bail plea moved by Bibhav Kumar, aide of Delhi CM Arvind Kejriwal, in the Swati Maliwal alleged assault case. His two bail petitions were dismissed by the trial court.
— ANI (@ANI) June 14, 2024

बिभव कुमार यांचा जामीन अर्ज 27 मे रोजी दिल्ली सत्र न्यायालयाने नाकारला होता. त्यांची दुसरी नियमित जामीन याचिका सत्र न्यायालयाने 07 जून रोजी फेटाळली होती. करण शर्मा आणि रजत भारद्वाज या वकिलांच्या माध्यमातून या जामीन याचिका दाखल करण्यात आली होती.