Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात संशयित आरोपी म्हणून सध्या तिहार तुरुंगात आहेत. शुक्रवारी त्याच्या नियमित जामीन याचिकेवर सुनावणी झाली. दरम्यान केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या याचिकेवर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने तिहार तुरुंग प्राधिकरणाकडून उत्तर मागितले आहे.
सुनावणीवेळी अरविंद केजरीवाल यांनी पत्नी सुनिता यांना वैद्यकीय मंडळासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचे निर्देश देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. त्यावर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून उत्तर मागितले आहे. या मागणीवर उद्या (दि.१४ जून) न्यायालयात सुनावणी (Arvind Kejriwal) होणार आहे.
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या जामीन अर्जावर बुधवार १९ जून रोजी सुनावणी होणार असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे देखील एएनआयने वृत्तात म्हटले आहे.
केजरीवालांच्या याचिकेवर कोर्टाकडून तुरूंग प्रशासनाला ‘उत्तर द्या’ नोटीस